पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिर परिसरात एक तळघर आढळून आलं आहे. मंदिर परिसरात पहिल्यांदाच अशा पद्धतीचं तळघर आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. राज्याच्या पुरातत्व विभागाकडून याची दखल घेतली जात असून अधिकची तपासणी सुरू आहे.
कान्होपात्रा मंदिराजवळ हे तळघर आढळून आलं असून इथं पुरातत्व विभागाचे अधिकारी पाहणीसाठी या मंदिरात दाखल झाले आहेत. या ठिकाणी असलेली माती सध्या बाहेर काढली जात आहे. जवळपास ४० ते ५० किलो माती बाहेर काढली जात आहे, त्याचंही परीक्षण केलं जाणार आहे. सात ते आठ फूट खोल अंतरावर हे तळघर आढळून आलं असून त्यात काही मुर्तीही आढळून आल्या आहेत. दरम्यान, या तळघरात तीन ते चार दगडी मूर्ती सापडल्या आहेत. तसेच पादुकाही सापडल्या आहेत. या ठिकाणी जे काही सापडतंय त्याची तपासणी करुन त्याचा संपूर्ण अहवाल हा राज्य सरकारला सादर केला जाणार आहे.
हे ही वाचा:
बलात्कार प्रकरणातील आरोपी प्रज्ज्वल रेवण्णा भारतात आला; तात्काळ केली अटक
मोदींसोबत, केतकरांनाही हॅट्रीकची संधी…
…आणि अचानक मनमोहन सिंग जागे झाले!
जम्मू-काश्मीरमधील अखनूरमध्ये बस दरीत कोसळली, २१ जणांचा मृत्यू!
पुरातत्व विभागाचे अधिकारी, मंदिर समितीचे अधिकारी तसेच मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या उपस्थितीत येथे काम सुरु आहे. तळघरात काय सापडणार याकडे विठ्ठल भक्तांचे लक्ष लागले आहे. आतापर्यंत यामध्ये विष्णूची मूर्ती, पादुका, एक लहान मूर्ती आणि काही नाणी सापडल्याची माहिती आहे. हे तळघर आणखी किती खोल आहे हे पाहिले जात आहे. विठ्ठल मंदिर हे वारकऱ्यांचं सर्वात मोठं देवस्थान आहे. येथे दरवर्षी लाखो लोकं विठ्ठलाच्या भेटीला येत असतात.