भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीर्थक्षेत्र काशी विश्वनाथ मंदिर धामचे लोकार्पण केले आणि अनेकांना पोटशूळ उठला. या कॉरिडोरवर कशाला एवढा खर्च वगैरे टीका होऊ लागली. त्यावर अनेक वाहिन्यांनी चर्चात्मक कार्यक्रम घेत मोदींना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. टीव्ही ९ चे सल्लागार संपादक अमिताभ अग्निहोत्री यांच्या टीव्हीवरील एका चर्चासत्रात त्यांनी उपस्थित पॅनलिस्टला याचसंदर्भात सवाल विचारत स्तंभित केले. त्याचा व्हीडिओ आता चांगलाच व्हायरल होतो आहे. या चर्चासत्रात केवळ अग्निहोत्री बोलत होते आणि पॅनेलिस्ट ऐकत होते.
अग्निहोत्री यांनी सवाल विचारला की, तुम्ही काशी विश्वनाथवर प्रश्न उपस्थित करणार! कृपा करून असे करू नका. शिखांनी कधी हा प्रश्न उपस्थित केला नाही की, सुवर्णमंदिराचे मूल्य काय आहे? व्हॅटिकन सिटीत कुणी प्रश्न विचारत नाही, मक्का मदिनावर कुणी प्रश्न उभे करत नाही, मग काशी विश्वनाथवर प्रश्न उपस्थित करण्याची हिंमत कशी काय केली जाते?
पॅनेलिस्टना बोलण्याची संधीही न देता ते परखडपणे काशी विश्वनाथाच्या मंदिरासंदर्भात उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नांवर बोट ठेवतात. ते म्हणतात, अयोध्येवर कसे प्रश्न विचारता? पूर्वी नेते नव्हते, राजकीय पक्ष नव्हते, राजकारण नव्हते तेव्हा देशाला कुणी एकत्र ठेवले? आपण तर नंतर जन्माला आलो. हजारो वर्षांच्या गुलामगिरीनंतरही अजून तुळशी वृदांवन आहे, त्यात दिवा लावला जात असेल, सत्यनारायणाची कथा अजूनही सांगितली जात असेल, बजरंगबलीचे मंदिर उभे असेल, रामसीता विवाहाच्या आठवणी कायम राहिल्या असतील तर या मठमंदिरांनी भारताचा आत्मा जिवंत ठेवला आहे. शक आले, हूण आले, न जाणे कोण कोण भारतात आले, काळाच्या उदरात सामावून गेले. पण काय करू शकले ते. आमची ओळख मिटविता येत नाही. म्हणून या बाबा विश्वानाथाच्या कॉरिडोरचे स्वागत करा. भारताच्या आत्म्याचा हा शंखनाद आहे.
अग्निहोत्री विचारतात की, मी राजकीय नेत्यांना पाहिले आहे जवळून. सर्वसामान्य माणूस अल्टो खरेदी करू शकत नाही, पण राजकीय नेते तर रोज खासगी विमानाने प्रवास करत आहेत आणि गरीबांसाठी अश्रू ढाळत आहेत. गरिबीची चेष्टा उडवू नका. दिवंगत अजित सिंग यांना एकदा मी विचारले होते की, तुम्हाला किती पेन्शन मिळते तर त्यांनी आकडे सांगितले. मी म्हटले, तुमचा खर्च तर दिवसातून २-३ लाख आहे आणि गरिबांबद्दल बोलत आहात.
अग्निहोत्री विचारतात की, आम्हाला गुलाम बनविण्यासाठी ज्या ठिकाणांवर घाव घालण्यात आले, ते आमचा आत्माही काबीज करण्यासाठी. मग त्या ठिकाणांचा जीर्णोद्धार होणार नाही तर कुठला होणार? तुमच्या शानदार घरासाठी पैसा उडवला तर तो चालतो, पण बाबा विश्वनाथच्या मंदिरावर खर्च झाला तर मात्र नको. मी अशा शेकडो राजकीय नेत्यांना ओळखतो ज्यांच्याकडे काशी विश्वेश्वर कॉरिडोरसाठी लागलेल्या पैशापेक्षा अधिक पैसा आहे, मालमत्ता आहे. १००-१०० एसी आहेत. इंद्राची सभा लावतात. पशूपक्षी पण विदेशी पाळलेत. ७.५ लाखांचा चष्मा घालतात. बाबा विश्वनाथवर हे लोक प्रश्न उपस्थित करतात. नैतिक सत्ता नाही तुमच्याकडे. तुम्ही कुठून कमावता? कामधंदा काय आहे तुमचा? बायोडेटात तुम्ही लिहिले आहे तुमचे काम समाजसेवा. पण रोज चकचकीत गाड्यांमधून डौलात फिरत आहात. बूट पण पांढरे शुभ्र. लोक म्हणतात की, आम्हाला कधी असे पांढरे बूट मिळतील. नैतिकतेच्या गप्पा तेव्हा करा जेव्हा आपले जीवन गांधी, लोहिया, दिनदयाल, जयप्रकाश यांच्यासारखे होईल. आपल्या मागे दोन-दोन कोटीच्या गाड्या चालत असतील तर गरिबीच्या गोष्टी चांगल्या वाटत नाहीत. तुम्ही लोहिया, गांधी, जयप्रकाश होऊ शकत नाही तर मग त्या गप्पा तरी मारू नका.
हे ही वाचा:
सुनील गावस्करांनी राजदीप सरदेसाईला दाखविली त्याची जागा
मुंबई विद्यापीठाच्या कालीना परिसरातील ३८ इमारती भोगवटा प्रमाणपत्राविना!
राज्यातील निवडणूका पुढे ढकलणार? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव
आपला हक्क आता हिसकावून घ्यावा लागेल
अग्निहोत्री यांनी एक उदाहरण दिले की, लोहिया म्हणाले होते एकदा श्रीकृष्णाबद्दल बोलताना. त्याला ५ हजार वर्ष झाली तरी त्या नरोत्तमाचा वाढदिवस अजूनही साजरा होतो म्हणजे ती व्यक्ती केवढी महान असेल याची कल्पना येते. आज बापाचा वाढदिवसही आपण साजरा करत नाही.