आनंद महिंद्रा म्हणतात, महाकुंभाला माझ्या हृदयात विशेष स्थान !

उद्योपती आनंद महिंद्रा यांनी व्यक्त केल्या भावना

आनंद महिंद्रा म्हणतात, महाकुंभाला माझ्या हृदयात विशेष स्थान !

महिंद्रा उद्योग समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी महाकुंभ मेळाव्याचा व्हिडिओ शेअर करत हा उत्सव शांततेत आणि कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या पण प्रसिद्धीच्या झोतात नसलेल्यांची प्रशंसा केली आहे. दर १२ वर्षांनी एकदा महाकुंभ मेळाव्याचे आयोजन केले जाते. अतिशय पवित्र असा हा मेळावा मानला जात असून आगामी महाकुंभ मेळा १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी २०२५ या काळात उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे होणार आहे. यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. यासाठी सर्वच स्तरावरून उत्सुकता व्यक्त केली जात आहे.

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, “महाकुंभाला माझ्या हृदयात विशेष स्थान आहे. १९७७ मध्ये चित्रपट निर्माता या क्षेत्राचा एक विद्यार्थी म्हणून त्या वर्षी माझ्या प्रबंध चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी महाकुंभला गेलो होतो. त्याला मी ‘यात्रा’ असे नाव दिले होते. तेव्हाही प्रशासनाने इतक्या उत्तमप्रकारे सोयीसुविधा देऊन हा मेळावा कसा हाताळला हे पाहून मला आश्चर्य वाटले. आज, उपस्थित राहण्याची अपेक्षित संख्या मनाला चकित करते. हे निःसंशयपणे जगातील सर्वात मोठे संमेलन आहे. हा सण शांततेत आणि कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्व लोकांना मी सलाम करतो. हे खरोखरच प्राचीन आणि आधुनिक जगातील दोन्ही आश्चर्यांपैकी एक आहे.”

हे ही वाचा : 

थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल; सहा महिन्यात वार्षिक सरासरीच्या ९५ टक्के गुंतवणूक

कर्नाटकात बस भाडेवाढ, आता पत्नीसाठी बस मोफत, पतीला दुप्पट भाडे!

रेल्वे रुळावर पडला होता लोखंडी दरवाजा; रेल्वे उलटवण्याचा होता कट!

सपा खासदार बर्क यांना दणका; एफआयआर रद्द होणार नाही

दर १२ वर्षांनी होणारा कुंभमेळा अवघ्या महिन्यावर येऊन ठेपलेला असताना देशभरासह जगभरातील भाविकांनी प्रयागराजला जाण्याची तयारी सुरू केली आहे. लाखोंच्या संख्येने भाविक या मेळ्यासाठी येत असतात. भाविकांचे योग्य नियोजन व्हावे यासाठी सध्या उत्तर प्रदेश सरकारकडून जोरदार तयारी सुरू आहे. महाकुंभ मेळ्यासाठी एक स्वतंत्र जिल्हाच योगी सरकारने जाहीर केला असून या जिल्ह्याचे पूर्ण व्यवस्थापन स्वतंत्र असेल, असं जाहीर करण्यात आले आहे. लाखोंच्या संख्येने भाविक या मेळ्यासाठी येत असतात त्यांचे योग्य नियोजन व्हावे यासाठी उत्तर प्रदेश सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

Exit mobile version