आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या हैदराबाद सभेत माईक हिसकावण्याची घटना समोर आली आहे. हिमंता बिस्वा सरमा मंचावर उपस्थित असताना ही घटना घडली आहे. गणपतीच्या विसर्जनाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा हे हैद्राबादला गेले होते, त्यावेळी हा प्रकार घडला.
#WATCH | Telangana: A man tried to confront Assam CM Himanta Biswa Sarma by dismantling the mike on a stage at a rally in Hyderabad pic.twitter.com/HFX0RqVEd8
— ANI (@ANI) September 9, 2022
आज, ९ सेप्टेंबर रोजी हिमंता बिस्वा सरमा यांना भाग्यनगर गणेश उत्सव समिती आणि उडुपी द्रष्टा पेजावर स्वामी धर्माधिकारी यांनी हैदराबाद येथील गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते. मंचावर त्यांच्यसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी त्यांच्या भाषणाआधीच एका व्यक्तीने गदारोळ करत माईक खेचण्याचा प्रयत्न केला आहे.
आसामचे मुख्यमंत्री मंचावर उभे होते. त्यांच्या बाजूचा एक व्यक्ती माईकवर बोलत असताना अचानक मागून एक व्यक्ती आला आणि त्याने माईक हिसकावण्यचा प्रयत्न केला. यादरम्यान मंचावर उपस्थित लोकांनी त्या व्यक्तीला पकडून मंचावरून खाली आणले.
हे ही वाचा:
७० वर्षांच्या काळात १८ भारतीय पंतप्रधानांना भेटल्या राणी एलिझाबेथ
अबब!! एलिझाबेथ यांची इतकी संपत्ती मिळणार वारसांना
याकुबच्या कबरीच्या सौंदर्यीकरणाला वक्फ बोर्डाचा पाठिंबा?
गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या… दहा दिवसांच्या बाप्पाला निरोप
माईकजवळ उभे असलेले मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यावेळी हसताना दिसत होते. काही वेळातच प्रकरण शांत झाले आणि त्या व्यक्तीला मंचावरून खाली उतरवण्यात आले. त्या व्यक्तीला काय हवे होते हे अद्याप कळू शकलेले नाही.