ऐतिहासिक वारसा लाभलेल्या गिरगावमधील मंदिरांना धोका निर्माण झाल्याचे समोर आले आहे. या भागातील प्राचीन जुनी मंदिरे नामशेष होत चालल्याची बाब हिंदू संघटनांनी उघडकीस आणत ही मंदिरे वाचवण्यासाठी हिंदुना एकटवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच हिंदूंनी मोठ्या संख्येने हिंदू मंदिर बचाव अभियानात सहभागी होण्याचे आवाहानही करण्यात आले आहे.
गिरगावला समृद्ध असा प्राचीन इतिहास असून जुनी मंदिरे, इमारतींच्या माध्यमातून आजही जिवंत आहे. मात्र, पुनर्विकासाच्या नावाखाली मंदिरे गिळंकृत केली जात असल्याची बाब हिंदू संघटनांनी निदर्शनास आणून दिली आहे. गिरगावच्या वैद्य वाडीमधील विठ्ठल रखुमाईचे मंदिर वाचवण्याचा संघर्ष सुरू आहे. तर, चंपावाडीमधील ओंकारेश्वर मंदिर गायब झाले आहे, असा दावा करण्यात येत आहे. पुढेही हे असेच सुरू राहिल्यास गिरगावची खरी ओळख पुसून जाईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
हे ही वाचा:
दिब्रिटोनी युरोप अमेरिकेत जन्म घ्यावा!
पठाणकोटमध्ये ७ संशयास्पद व्यक्ती दिसले, जम्मूमध्ये हाय अलर्ट !
सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यापूर्वी नेमबाजांना अनमोल बिश्नोईने दिला होता खास संदेश
पाकिस्तानचे नापाक मनसुबे कधीही यशस्वी होऊ देणार नाही!
गिरगावची प्राचीन ओळख टिकवून ठेवण्यासाठी आणि मंदिरे वाचवण्यासाठी हिंदू समजाने संघटीत होण्याची गरज असल्याचे सामाजिक कार्यकर्ते राघवेंद्र व्यंकटेश कौलगी यांनी म्हटले आहे. तर, यासाठी हिंदू मंदिर बचाव अभियानमध्ये जास्तीत जास्त संख्येने हिंदूंनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.