28 C
Mumbai
Friday, November 22, 2024
घरधर्म संस्कृती'लालसिंह चढ्ढा'वर प्रेक्षकांची का सटकली?

‘लालसिंह चढ्ढा’वर प्रेक्षकांची का सटकली?

Google News Follow

Related

लाल सिंह चढ्ढा हा अभिनेता-निर्माता आमीर खान याचा सिनेमा येत्या शुक्रवारी ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होतोय. गेले अनेक दिवस समाज माध्यमांमध्ये #BoycottLalSinghChaddha #BoycottBollywood #BoycottKareenaKapoorKhan हे ट्रेंड जोरात आहेत. या बहिष्कार अस्त्रामुळे धास्तावलेल्या आमीर खानने माझ्या सिनेमावर बहिष्कार घालू नका. माझे देशावर प्रेम नाही हा प्रचार असत्य आहे, असे खुलासे करायला सुरूवात केली आहे.

एकेकाळी प्रेक्षकांच्या आँखों का तारा असलेल्या आमीरवर लोकांची इतकी सटकली त्याची कारणे बरीच आहेत. पीके या सिनेमातून त्याने हिंदू देवदेवतांची यथेच्छ टवाळी केली. त्यानंतर तो जुलै २०२१ मध्ये हज यात्रेला जाऊन आला. तिथे त्याने सगळ्या इस्लामी रीतीरीवाजांचे मनापासून पालन केल्याचे जगाने पाहिले. खटका नेमका इथेच उडाला. आमीरची भूमिका सुधारणावादी नसून दुटप्पी आहे, याचा प्रत्यय लोकांना आला.

हिंदूच्या पैशावर मानमरातब, पैसा आणि प्रसिद्धी कमवायची आणि त्यांच्याच आराध्यांची टवाळी करायची ही बॉलिवूडची परंपरा आहे. या परंपरेवर इस्लामचा पगडा जुना आहे. ब्लॅक एण्ड व्हाईटच्या जमान्यापासून हिंदू नायक, हिंदू नायिकांच्या तोंडी अल्ला ठाण मांडून बसला आहे. अल्ला जाने क्या होगा आगे, मौला जाने क्या होगा आगे… इथ पासून ‘मुझे प्यार हुवा प्यार हुआ अल्ला मियाँ’पर्यंत असंख्य गाण्यांचा प्रवास सांगता येईल. हिंदूंनी हे चालवून घेतलं म्हणून हे प्रकार चालले. सलीम-जावेदने हा पगडा अधिक मजबूत केला.

भल्या, कनवाळू, जीवाला जीव देणाऱ्या, त्याग करणाऱ्या सगळ्या भूमिका मुस्लीम कॅरेक्टच्या वाट्याला या जोडगोळीने बहाल केल्या दिवार मधला रहीम चाचा, शोलेतले इमाम साहब, शानमधला अब्दुल, जंजीरमधला शेरखान. हिंदू देवतांच्या टवाळीचे आद्य जनक सलीम जावेदच आहेत. दिवारमधला नायक मंदीरात जात नाही, प्रसाद खात नाही. पण ७८६ च्या बिल्ल्याची सतत चुंबन घेत असतो. शोलेमध्ये हनुमान मंदीरातला प्रसंग आठवा. शानमध्ये अमिताभ, शशी कपूर यांनी साधूंच्या रुपात केलेली लुटालूट, असे कित्येक प्रसंग सांगता येतील.

हिंदूंकडून पैसा कमावायचा आणि त्यांच्या देवतांची पडद्यावर टवाळी करायची हा ट्रेंड जुना आहे. हीच मंडळी हिंदूंच्या सणाला ज्ञान पाजळायलाही येतात. पण मुस्मील धर्माचा विषय आला की यांच्या तोंडाला बूच बसते. दर काही वर्षांनी नव्या हिंदू तरुणीशी लग्न करायचे आणि ठराविक काळानंतर त्यांना तलाक देऊन नवं बिऱ्हाड करायचं हा आमीर खानचा नित्याचा उद्योग. आणि हा सत्यमेव जयतेमध्ये लोकांना ज्ञान वाटत फिरत होता. तथाकथित फेमिनिस्ट या मुद्यावर कायम मूग गिळून असतात. पण काळ बदलत असतो. बॉलिवूडचा हिंदूद्रोही चेहरा उशीरा का होईना लोकांच्या लक्षात आलाय. आपण यांनी श्रीमंत करायचे नाही, असा निर्धार करून हिंदू आता मैदानात उतरला आहे.

करीना कपूरने आपल्या पहिल्या मुलाचे नाव तैमूर ठेवले. दुसऱ्या मुलाचे नाव जहांगीर. तैमूरवरून सोशल मीडियामध्ये संताप व्यक्त केला जात होता. हिंदूंचे शिरकाण करणाऱ्या बादशहाचे नाव नेमके करीनाला सुचले की सैफला?
वैयक्तिक आय़ुष्यात, कौटुंबिक जीवनात काय करायचे, आपल्या मुलांची नावे काय ठेवायची, हा अधिकार प्रत्येकाला आहे. तो अधिकर वापरून उद्या त्यांच्या मुलाचे नाव कसाब आणि जिना पण ठेवू शकतो. हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण त्यामुळे तुमच्यावर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांनी जर तुमच्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्धार केला, तर तोही त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, असे मानायला काय हरकत आहे.

ज्यांच्या जीवावर पैसा आणि प्रसिद्धी मिळते, त्यांना माज दाखवण्यातही ही मंडळी मागेपुढे पाहात नाहीत. दोन वर्षांपूर्वी जेव्हा सिनेमातील घराणेशाहीबाबत विचारले तेव्हा करीना म्हणाली होती की सिनेमा बघावा म्हणून आम्ही जबरदस्ती थोडीच करतो, नका बघू आमचे सिनेमे. हा माज बॉयकॉटच्या ट्रेंडनंतरही कमी झालेला नाही. सिनेमा चांगला असेल तर या सगळ्या गोष्टींना पचवून यशस्वी होतो असे ती म्हणाली आहे.

हे ही वाचा:

जीएसटी संकलनात महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा

८००० वर्षांपूर्वीची संस्कृती; सौदी अरेबियाच्या वाळवंटात सापडले प्राचीन मंदिर

…आणि पृथ्वी स्वतःभोवती जोरात फिरली!

राऊत यांच्या अटकेबद्दल बाळासाहेब ठाकरेंच्या चालकाने वाटले पेढे!

 

थोडक्यात, प्रेक्षकांना फाट्यावर मारणारी ही मानसिकता आहे. या मनमानीला गेल्या काही वर्षात झटका बसताना दिसतोय. शहारुख खानचे अनेक सिनेमे गेल्या काही वर्षात रांगेत फ्लॉप गेले आहेत. लाल सिंह पण त्याच मार्गावर जातोय हे आमीर खानच्या लक्षात येते आहे. तो प्रेक्षकांच्या मिनतवाऱ्या करतोय. पण करीनाचा माज अजून कायम आहे. खरे तर आमीर काय आणि करीना काय, दोघांना प्रेक्षकांना काय वाटते याच्याशी घेणे देणे नाही. पण प्रेक्षकांनी लाथ मारली तर सिनेमाच्या यशातून मिळणारे कोट्यवधी रुपये कसे मिळणार, ही खरी चिंता आहे.

प्रेक्षकांच्या सुदैवाने आता बॉलिवूडची मोनोपोली उरलेली नाही. लोकांकडे दक्षिणेतील सिनेमांचा कसदार पर्याय आहे. खरे तर भाषेचा अडथळा सब टायटल्समुळे कधीच संपलेला आहे. ओटीटीने बॉलिवूडला पाचर ठोकून ठेवली आहे. लोक कोरीयन सिनेमेही चवीने बघू लागलेत. भारताचा कट्टर वैरी असलेल्या तुर्कीयेचा राष्ट्राध्यक्ष अरर्दोगनची त्याच्या देशात जाऊन काही काळापूर्वी आमीरने भेट घेतली. पाकिस्तान मौलवींसोबतही त्याच्या गाठीभेटी सुरू असतात. हज यात्रेच्या वेळी तो पाकिस्तानी मौलना तारीक जमीलला भेटला. शाहीद आफ्रिदीने दोघांची भेट घडवून आणली. मक्का आणि मदीना येथे आमीरने या मौलवीशी इस्लामबद्दल तासंतास चर्चा केली. म्हणून आमीर हा दुटप्पी आणि भामटा आहे. कडवा मुस्लीम आहे. आणि त्याच्या धर्माच्या शिकवणीनुसार तो इतर धर्मांचा द्वेष करतो. पीकेमध्ये त्याने ते सिद्ध ही केलं आहे. आमीरचा हा गोतावळा पाहिल्यानंतर पैसे खर्च करून त्याचे सिनेमा पाहायला जाण्याची इच्छा प्रेक्षकांमध्ये उरलेली नाही.
प्रेक्षक हल्ली सिनेमा पाहण्यापेक्षा तो पाडण्यात जास्त इच्छुक असतात, असे विधान अलिकडेच कोण्या बॉलिवुड सेलिब्रेटीने केले आहे. जे खरंही आहे. पण या मानसिकतेची जबाबदारी प्रेक्षकांपेक्षा जास्त बॉलिवूडवाल्यांची आहे. प्रेक्षकांच्या लक्षात आलं आहे, ये लातों के भूत है…

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा