मोदींनी दानपेटीत नोटा टाकल्या होत्या, पाकीट नव्हे

पुजाऱ्याचा दावा ठरला खोटा

मोदींनी दानपेटीत नोटा टाकल्या होत्या, पाकीट नव्हे

राजस्थानच्या भिलवाडामध्ये २८ जानेवारी २०२३ रोजी श्री देवनारायण यांच्या ११११व्या प्रकट दिनाच्या महोत्सवामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. या दरम्यान गुर्जर समाजाच्या श्री देवनारायण मंदिराच्या दानपेटीत त्यांनी पाकीट नव्हे तर नोटा टाकल्या होत्या. या मंदिराच्या पुजाऱ्याने मोदी यांनी यात पाकीट टाकल्याचा दावा केला होता. हे पाकीट नऊ महिन्यांनंतर उघडले असता, त्यात २१ रुपये होते. तर, दानपेटीत आणखी दोन पाकिटेही होती. एका पाकिटात १०१ रुपये तर, दुसऱ्यात २१०० रुपये होते. आता भाजपने पुजाऱ्याचा हा दावा खोडून काढला आहे.

 

श्री देवनारायण यांच्या ११११व्या प्रकट दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी मालासेरी डुंगरी यांचे दर्शन घेण्यासाठी आले होते. या दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी दानपेटीत टाकलेल्या पाकिटात २१ रुपये होते, असा दावा करण्यात आला होता. मात्र भाजपने प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओनुसार, मोदी यांनी या दानपेटीत पाकीट नव्हे तर पैसे टाकल्याचे आढळले आहे.

 

हे ही वाचा:

तरुणाने आत्महत्येचे पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी त्याला हेरले!

कॅनडामध्ये प्रवेश मिळालेले तब्बल छत्तीस हजार विद्यार्थी चिंतेत

हरित क्रांतीचे जनक एमएस स्वामीनाथन यांचे निधन!

निज्जरची हत्या पाकिस्तानकडून?

मालासेरी डुंगरीचे पुजारी हेमराज पोसवाल यांनी प्रसारमाध्यमांसमोर पाकीट उघडून पांढऱ्या रंगाचे पाकीट पंतप्रधान मोदी यांनी टाकले असल्याचा दावा केला होता. मंदिराच्या पुजाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल होताच, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आणि राजस्थान वीज निगम आयोगाचे अध्यक्ष धीरज गुर्जर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीर्थक्षेत्र भीलवाडाला काहीही दिले नाही, असा दावा केला होता.

 

 

‘हजारोंच्या संख्येने उपस्थित गुर्जर समाजाच्या बांधवांसमोर तुम्ही आणि भाजपने मी गुर्जर समाजाला जे काही दिले आहे, ते मंदिराच्या दानपेटीत टाकले आहे, असे सांगितले होते. मात्र आज दानपेटी उघडल्यानंतर पाकीट उघडण्यात आल्यानंतर त्यातून केवळ २१ रुपये मिळाले आहेत. ते गुर्जर समाज आणि राजस्थानच्या समोर आले आहेत,’ अशी टीका त्यांनी केली.

Exit mobile version