प्रसिद्ध मल्याळी चित्रपट निर्माते अली अकबर आता हिंदू झाले आहेत. १३ जानेवारी रोजी त्यांच्या पत्नीने त्यांच्या सोबत हिंदू धर्म स्वीकारला आहे. अकबर हे आता राम सिंहन या नावाने ओळखले जातील आणि त्यांची पत्नी लुसिम्मा म्हणून ओळखली जाईल.
असा निर्णय त्यांनी का घेतला?
सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघातावर धार्मिक कट्टरवाद्यांनी आनंद व्यक्त केल्याने ते संतप्त झाले होते. अशा मुस्लिम धर्माच्या लोकांवर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांचा संबंध राष्ट्रवादाशी जोडला होता. त्यावरच नाराज होऊन आपण इस्लाम धर्म सोडून सनातन धर्म स्वीकारत आहोत असे या दिग्दर्शकाने सांगितले होते.
अली अकबर आणि त्यांच्या पत्नीचा फोटो सोशल मीडियावरून समोर आले आहेत. शुद्धीकरण समारंभात दोघेही हवनकुंडाजवळ बसून यज्ञ करताना दिसत आहेत. यावेळी अली अकबरने खांद्यावर भगवे आणि पांढरे वस्त्र घेतल्आयाचे दिसत आहे. आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, विश्व हिंदू परिषद आणि हिंदू सेवा केंद्राचे नेते प्रतिश विश्वनाथ यांनी फेसबुकवर याबाबत माहिती दिली आहे.
हे ही वाचा:
अर्थसंकल्पीय अधिवेशन या तारखेला होणार
अयोध्येत योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात उभी राहणार शिवसेना
केरळ भाजपचे पदाधिकारी होते अकबर उर्फ राम सिंहन
अली अकबर हे केरळातील भाजपच्या प्रदेश समितीचे सदस्य होते. दोन महिन्यांपूर्वीच पक्षासोबत झालेल्या मतभेदानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. २०१४ मध्ये आम आदमी पक्षाच्या तिकीटावर त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यानंतर भाजपच्या तिकीटावर कोझीकोडे येथील महापालिका निवडणुकीत उतरले होते. रामसिंहन यापूर्वी २०१५ मध्ये खूप चर्चेत आले होते.