राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मुंबईत अक्षता कलश यात्रांचे आयोजन

भाजपाच्या लोकप्रतिनिधींकढून पुढाकार

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मुंबईत अक्षता कलश यात्रांचे आयोजन

अयोध्येमध्ये भुतो न भविष्यती असा अतिभव्य राम मंदिरात प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडणार आहे. याला अजूनकाही दिवसांचा अवधी असला तरी मुंबईसह देशभरात आतापासूनच वातावरण निर्मिती सुरू झाली आहे. या निमित्ताने मुंबईत भाजपाच्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून अक्षता कलश यात्रांचे आयोजन केले जात आहे. तर अनेक ठिकाणी श्रीराम कथांचे प्रवचन आयोजित केले जात आहे.

अयोध्येमध्ये नव्या राम मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आले असून २२ जानेवारीला हे मंदिर खुले होणार आहे. या दिवशी रामाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू असून संपूर्ण देशभरातच यानिमित्ताने भाजपच्या लोकप्रतिनिधींकडून यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. मुंबईत सर्व विभागांमध्ये सध्या दररोज विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. रामजन्मभूमी अयोध्या येथून आणलेल्या मंत्रित अक्षता दर्शन आणि पूजनाचा कार्यक्रम सर्व विभागांमध्ये केला जात आहे. या अक्षतांची कलश यात्राही ठिकठिकाणी आयोजित केली जात आहे. या यात्रांद्वारे सर्व नागरिकांना प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रित केले जात आहे.

हे ही वाचा:

जयंत पाटील भाजपाबरोबर येणार असल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता

इम्रान खान निवडणूक लढण्यास अपात्र

‘सर्व निर्णय घेताना प्रथम असते फक्त राष्ट्रहित’!

३१ वर्षे पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी सापडला जाळ्यात!

गेल्या आठवड्यात वांद्रे पूर्व परिसरातही अशाच कलश यात्रेच आयोजन करण्यात आले होते. खेरवाडी येथील राम मंदिरातून ही कलश यात्रा सुरू झाली. तसेच मालाडमध्येही कलश यात्राचे आयोजन करण्यात आली होती. तर शुक्रवारी गिरगाव परिसरातही पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मतदारसंघात फडके गणपती मंदिर ते पाठारे प्रभू श्रीराम मंदिर पर्यंत कलशयात्राचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर मालाडमध्ये गेल्या सात आठ दिवसांपासून श्रीराम कथाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अयोध्या राम मंदिर खटल्यातील महत्त्वाचे साक्षीदार ठरलेले पद्मविभूषण स्वामी रामभद्राचार्य महाराज हे रामकथा सादर करीत आहे.

Exit mobile version