असदुद्दीन ओवेसी यांच्या एआयएमएम या पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष मोहम्मद रुवेद साबिर आणि त्यांची पत्नी समिना परवीन यांनी हिंदू धर्मात प्रवेश करण्याचे ठरविले आहे. आपल्या पक्षातील लोक आणि नेत्यांकडून आमच्या संकटकाळात कोणतीही मदत केली गेली नाही, त्यामुळे आम्ही धर्म बदलण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून मदतीची आशा आहे.
आख़िर ये धर्म के ठेकेदार कब अपनी हरकतों से बाज आयेंगे कब तक महिलाओं को परेशान किया जाएगा, ऐसे लोगों का योगी सरकार में ही इलाज संभव है.pic.twitter.com/dCMo2C1kvO
— Anand Shanker (@AnandShankerBJP) April 11, 2022
हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून सातत्याने छळ होत असल्याने त्याविरोधात आपण संघर्ष करत होतो पण तिच्या जवळचे कुणीही आपल्याला मदत करायला पुढे येत नव्हते. त्यामुळे समिनाने हिंदू धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला. समिनाने अनेक प्रभावी मुस्लिम नेत्यांकडे आपली समस्या मांडली. संघटनांकडे ती गेली पण कुणीही तिला न्याय देण्यासाठी मदत केली नाही. त्यामुळे ती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे गेली. तिथे त्यांच्याकडून मदत मागितलीच शिवाय स्वयंस्फूर्तीने धर्मांतर करण्याची तिने तयारीही दाखविली.
हे ही वाचा:
रशियासमोर आता आणखी दोन ‘युक्रेन’!
शरद पवार भाषण करताना व्यक्ती पोहोचला मंचावर
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले १०८ फुटी हनुमान पुतळ्याचे उद्घाटन
तिने व्हीडिओच्या माध्यमातून आपली ही तक्रार मांडली आहे. ती म्हणते की, तिने मोहम्मद रुवेद साबिर यांच्याशी विवाह केला. पण नंतर सासरच्या मंडळींकडून तिचा छळ सुरू झाला. तिच्याकडे हुंडा मागण्यास प्रारंभ झाला. साबीर हा आपला एकुलता एक मुलगा असल्यामुळे त्याच्यासाठी मोठी रक्कम समिनाकडे मागण्यात आली. लग्नानंतरही हुंडा मागण्याची मालिका थांबली नाही. यानंतर साबीर यानेही आमचा योगी आदित्यनाथ यांच्यावर पूर्ण विश्वास असल्याचे म्हटले आहे. ज्या लोकांशी आपला संघर्ष आहे ते समाजवादी पार्टीचे गुंड आहेत. माझे वडीलही समाजवादी पार्टीचे समर्थक आहेत.
पोलिसांनी यासंदर्भात सांगितले की, समिनाने याआधीही हुंड्याविरोधात सासऱ्यांविरोधात तक्रार केली होती.