आता लसीकरणाचा वेगही चांगलाच वाढत असल्यामुळे समारंभाचा आनंद लुटण्यासाठी सामान्य माणूस सरसावला आहे.
दिवाळी जवळ आली की, वेध लागतात ते लग्नसराईचे. तुळशीच्या लग्नानंतर लग्नसमारंभांना सुरुवात होते. गेल्या पावणेदोन वर्षांमध्ये कोरोना सावट असल्यामुळे अनेक सण समारंभावर निर्बंध आले होते.
दिवाळीनंतर तुळशीविवाह झाल्यानंतर लग्नाची धामधूम सुरू होते. शहरी तसेच ग्रामीण भागातील मंगल कार्यालयाच्या बुकिंग तारखा आता बुक होऊ लागलेल्या आहेत. पितृपक्ष संपून आश्विन सुरू झाल्यापासूनच उपवर मुला-मुलींसाठी आयुष्याचा जोडीदार बघण्यास वधू-वर पक्षांकडील कुटुंबीयांची धावपळ सुरू झाली आहे.
नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत विवाहाचे अनेक मुहूर्त आहेत. त्यामुळेच पालकांनी आता पुण्यातील कार्यालयातील तारखा आरक्षित करण्यास सुरुवात केलेली आहे. मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील मंगल कार्यालयातील तारखा आता फुल्ल झालेल्या आहेत. वीस महिने विवाह सोहळे न झाल्याने मंगल कार्यालये ओस पडली होती. आता विवाहासाठी एकदम मागणी वाढल्याने मंगल कार्यालयांची कमतरता भासत आहे.
सध्याच्या घडीला मंगल कार्यालये,लॉन्स,पार्टी हॉल या ठिकाणी स्वच्छता, रंगरंगोटीची कामे सुरू झालेली आहेत. लग्नासाठी लागणारे सर्व उद्योग आता बहरू लागलेले आहेत. येत्या काही महिन्यातील मंगल कार्यालयांच्या तारखाही आता फुल्ल झालेल्या आहेत. लग्नासाठी केटरर्स ,मंडप व्यावसायिक, भटजी, बँड, सनई -चौघडा, सजावटकार यांची आता कामाची लगबग वाढली आहे. त्यामुळ गेल्या काही महिन्यांपासून ठप्प असलेले अनेक उद्योग आता बहरू लागलेले आहेत. लग्न सराईच्या या मोसमामुळे वातावरणात एक आनंदाचा नूर दिसून येत आहेत. मुख्य म्हणजे अनेक महिन्यांपासून आलेले काळोखे मळभ आता दूर होणार आहे. त्यामुळे पालकांसह वधू वरही आता लग्न सराईसाठी जय्य्त तयारी करण्यात गुंतले आहेत.
हे ही वाचा:
चीनचे ‘काळे’ कारस्थान; अनेक मासे मृत
गांजा फुकून आरोप करताना थोडा अभ्यास करा
‘एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत, पण मंत्री भेटायलाही जात नाहीत’
मुख्यमंत्रीजी, पेन्शन नाही, निदान आत्महत्या तरी करू द्या!
विवाह मुहूर्ताच्या कालावधीत अनेकांच्या हाताला रोजगार मिळू शकणार आहे. लग्नावर आधारीत अनेक उद्योगधंदे असतात, त्यामुळे आता ठप्प झालेल्या उद्योगांसाठी नवे सुगीचे दिवस आलेले आहेत. त्यामुळे व्यावसायिकांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.