रामलल्लाला हक्काचे घर मिळाल्यानंतर शेजारच्या शंकरालाही मिळाले छप्पर

कुबेर टेकडीवर नवे शिवमंदिर

रामलल्लाला हक्काचे घर मिळाल्यानंतर शेजारच्या शंकरालाही मिळाले छप्पर

राम जन्मभूमी परिसरात भव्य राम मंदिरासह एका शिवमंदिराचीही उभारणी होत आहे. गेल्या कित्येक शतकांपासून मोकळ्या आकाशाखाली राहणाऱ्या महादेवाला आता रामलल्लासह कायमस्वरूपी छप्पर मिळाले आहे. हे मंदिर कुबेर टेकडीवर आहे. पंतप्रधान मोदी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर या कुबेर टेकडीवरील शिवमंदिरातही जाण्याची शक्यता आहे.

श्री राम जन्मभूमी परिसरातील कुबेर टेकडीवर हे प्राचीन शिवमंदिर आहे. शिवमंदिराची भिंत अडीच फूट रुंद आणि पाच फूट उंच होती, असे सांगितले जाते. शिवमंदिराला एक मोठा आणि एक छोटा दरवाजा होता. छप्पर नव्हते. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टतर्फे आता या मंदिराचा पुनर्विकास होत आहे.

मंदिराचे डिझाईन टाटा कन्सल्टिंग इंजिनीअर्स लिमिटेडने केले आहे. तर, कंत्राटदार म्हणून एल अँड टी काम करत आहेत. येथील जुन्या भिंती हटवून काँक्रीटचा पाया रचण्यात आला. त्यानंतर लोखंडाचे खांब उभारण्यात आले. त्याच्यावर मजबूत पाया बांधून भव्य मंदिर बांधले जात आहे. शिवलिंग आणि नंदीला अडथळा न आणता हे काम केले जात आहे. या मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आहे.

हे ही वाचा:

किशोरी पेडणेकर, रोहित पवारांना ईडीकडून समन्स

देशातील सर्वात मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पाचे पंतप्रधान मोदींकडून लोकार्पण; कसा आहे प्रकल्प?

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश म्हणाला, ‘माझा रामलल्ला विराजमान झाला’!

नरेंद्र मोदींच्या रूपाने ग्लोबल, व्हिजनरी लीडर लाभला

हा डोंगर म्हणजे महादेव आणि कुबेर यांचे कायमस्वरूपी निवासस्थान मानले जाते. श्री रुद्रयामलमध्ये अयोध्या महात्मा खंडाच्या अंतर्गत पार्वती आणि शंकर यांच्या संवादादरम्यान ज्या प्रमुख तीर्थांची चर्चा झाली, त्या रामकोट क्षेत्रातील श्रीराम जन्मभूमीसह अन्य ४३ पौराणिक स्थळांचाही समावेश आहे. त्यात या कुबेर टेकडीचाही समावेश आहे.

Exit mobile version