काशी विश्वनाथाच्या मंदिराच्या संदर्भात वाराणसी जिल्हा न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. न्यायालयाने आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाला (एएसआय) ज्ञानवापी मस्जिदीच्या परिसराची पहाणी करण्याचे आदेश दिले आहेत. ही मस्जिद विश्वनाथ मंदिराच्या जागी उभी असल्याचा दावा केला जात आहे.
स्थानिक वकिल वी एस रस्तोगी यांनी जिल्हा सत्र न्यायालयात सध्या ज्ञानवापी मशिद ज्या जमिनीवर उभी आहे ती जमिन हिंदूंकडे हस्तांतरत करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली. इ.स. १६६४ मध्ये औरंगजेबाने त्या जागी उभे असलेले विश्वनाथाचे मंदिर तोडून तिथे ज्ञानवापी मस्जिद उभारली होती.
हे ही वाचा:
अँटिलिया समोर जिलेटीनने भरलेली गाडी ठेवण्यात मनसुख हिरेन यांचा हात
…तर खांडेकर संपादक पदाचा राजीनामा देणार का?
औरंगजेब झाला बद ‘सुरत’ (भाग ७)
हा खटला स्वतः ज्ञानवापी मस्जिद कमिटी लढत होती. वाराणसी जिल्हा न्यायालयाने एएसआयला या मस्जिदीच्या परिसराचा सर्व्हे करण्याचे आदेश दिले आहेत. या सर्व्हेचा सगळा खर्च उत्तर प्रदेश राज्य सरकारतर्फे केला जाणार आहे.
या सर्व्हेसाठी कोर्टाने ५ सदस्यीय समिती नेमण्याचे निर्देश दिले आहेत. त्यापैकी २ सदस्य मुसलमान असतील.
कितीही प्रयत्न केला तरीही औरंगजेबाचा कालखंड हा भयानक कालखंड होता याचे भरपूर पुरावे उपलब्ध होतात. औरंगजेबाच्या काळात मोठ्या प्रमाणात धर्मांतरे, मंदिरांचे विध्वंस झाले. शिवाय त्याच्याच काळात जिझिया कर देखील लादण्यात आला होता. औरंगजेबाच्या क्रुर कार्यकाळाचे आणि तथाकथित ‘गंगा जमनी तहजीब’चे स्मारक म्हणजे ही ज्ञानवापी मस्जिद आहे.
औरंगजेबाने त्याच्या अत्यंत क्रुर धार्मिकतेचे दर्शन घडवत ऑगस्ट १६६९ मध्ये काशीचे विश्वनाथाचे मंदिर पाडून टाकले. त्यानंतर त्या जागेची मानखंडना करण्यासाठी तिथे मशिद उभी केली- ज्ञानवापी मशिद! काशीचे सध्याचे विश्वनाथाचे मंदिर त्या मस्जिदीच्या बाजूला १७८० मध्ये बांधण्यात आले.
सुब्रमण्यम स्वामी यांची याचिका
सुब्रमण्यम स्वामी यांनी न्यायालयात धार्मिक पुजास्थळे कायदा, १९९१ घटनेच्या विरुद्धच नाही, तर घटनेच्या मुलभूत संकल्पनेला छेद असल्याची याचिका दाखल केली होती. त्यांनी यात बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले विश्वनाथाचे मंदिर एकदा कुतुबुद्दीन ऐबकाने इ.स. ११९४ मध्ये आणि औरंगजेबाने इ.स.१६६९ मध्ये तोडल्याचा दावा केला होता. या मशिदीत मंदिराचे अवशेष अजूनही दिसत असल्याचे देखील या याचिकेत म्हटले होते.