हरिशंकर जैन, विष्णू जैन हे ज्ञानवापी प्रकरणाचे खरे नायक!

हरिशंकर जैन, विष्णू जैन हे ज्ञानवापी प्रकरणाचे खरे नायक!

सध्या देशभर ज्ञानवापी मशिद-मंदिराचा मुद्दा गाजतो आहे. न्यायालयात हे प्रकरण तूर्तास प्रलंबित आहे. त्यावर सुनावणी सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणात सनातन हिंदू धर्माची बाजू लढवत आहेत ते हरिशंकर जैन आणि त्यांचे सुपुत्र विष्णू जैन. कोण आहेत हे दोघे पितापुत्र आणि काय आहे त्यांची कहाणी.

हरिशंकर जैन आणि विष्णू जैन पेशाने वकील. वकिलांचा पेशा स्वीकारलेले लोक व्यवसाय म्हणून खरे तर कोणत्याही केसेस स्वीकारू शकतात. बलात्कारी, अतिरेकी, गुन्हेगार यांच्या केसेस लढविताना ते आपल्या व्यवसायाचा विचार करतात, त्यातून भरघोस अर्थार्जनही करतात. पण जैन पितापुत्र आपला व्यवसाय सांभाळताना सनातन हिंदू धर्माचा विचार करूनच केसेस स्वीकारतात, त्यासाठी संघर्ष करतात. हरिशंकर जैन यांचा जन्म २७ मे १९५४ला झाला. सत्र न्यायालय, लखनऊ उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय असा त्यांचा प्रवास झाला आहे. तर त्यांचे सुपुत्र विष्णू जैन यांचा जन्म १९८६चा. यांनी जो पहिला खटला लढला तो रामजन्मभूमीचा. हरिशंकर जैन हे त्यात होते नंतर विष्णू जैन होते. आतापर्यंत ते १०२ असे खटले लढत आहेत. ते सगळे सनातन हिंदू धर्माविषयीचे आहेत. अयोध्या मुद्द्यावर त्यांना पैसे देऊन आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न झाला, पण त्यांनी नकार दिला. हे व्यवासायाच्या नजरेतून ते पाहात नव्हते. मथुरा व वक्फ बोर्ड कायद्याविरोधात केसही लढत आहेत. प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्टलाही त्यांनी आव्हान दिले आहे.  १९९२ला जेव्हा बाबरीचा ढाचा पडला तेव्हा तिथे पूजाअर्चा बंद झाली होती, त्यावर हरिशंकर जैन यांनी ती सुरू करण्यास सांगितले. आमचा त्यावर अधिकार आहे, हे सिद्ध करण्यासाठी पूजाअर्चा सुरू व्हायला हवी असे त्यांचे म्हणणे होते. संविधानाच्या मूळ प्रतीवर श्रीरामाचे चित्र आहे. त्यावर अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ बेंचने मान्य केले की, त्यांचे दर्शन आणि पूजेला रोखता येणार ही. तेव्हा त्याला सुरुवात झाली.

हे ही वाचा:

औरंगाबादमध्ये भाजपाचा ‘जल आक्रोश मोर्चा’

लिलावतीचे ‘सिक्युरिटी’ पराग जोशींचं काय चुकलं?

ब्रिटनमध्ये ‘विचारवंत’ राहुल रुजवण्याचा प्रयत्न

ज्ञानवापी मशीद प्रकरणी उद्या न्यायालय देणार निकाल

 

विष्णू जैन यांनी एका भाषणात म्हटले होते की, दिल्लीत असताना वडील हरिशंकर यांना अस्थमाचा अटॅक आला त्यांना वाचवणे कठीण होते. त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात येणार होते. तेव्हा हरिशकंर यांनी विष्णू जैन यांना बोलावून सांगितले की, लखनौचा जो मशिदीचा मुद्दा आहे, तिथे मंदिर आहे असा आपला दावा आहे. त्यावर उत्तर पाठवा ताबडतोब नाहीतर आपण केस हरू. तेव्हा विष्णू जैनला वाटले की, वडील मृत्यूच्या दारात असतानाही केसबद्दल विचार करत आहेत, तर आपणही हा आदर्श बाळगला पाहिजे. तेव्हा विष्णू जैननेही या कामाला स्वतःला वाहून घेतले.

दोघेही मोठे शुल्क आकारून ऐशोआरामी जीवन जगू शकले असते, पण त्यांनी सनातनी हिंदू धर्मासंदर्भातील केसेस हेच जीवनकार्य मानले आहे.

Exit mobile version