अयोध्या राम मंदिर प्राण प्रतिष्ठाचे प्रमुख आचार्य पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांचे निधन

वयाच्या ९१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अयोध्या राम मंदिर प्राण प्रतिष्ठाचे प्रमुख आचार्य पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांचे निधन

अयोध्येत बांधलेल्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे मुख्य आचार्य आणि काशीचे महान अभ्यासक पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांचे निधन झाले. वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अयोध्येत राम मूर्ती प्राणप्रतिष्ठेवेळी श्री रामाचा अभिषेक १२१ पुजाऱ्यांनी केला होता. लक्ष्मीकांत दीक्षित हे मुख्य पुजारी होते. रामलल्लाच्या अभिषेकवेळी त्यांच्यासह ५ जण गर्भगृहात होते. पंडीत लक्ष्मीकांत दीक्षित हे मूळचे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील आहेत. त्यांचे कुटुंब अनेक पिढ्यांपासून काशीमध्ये राहत आहे. लक्ष्मीकांत दीक्षित हे वाराणसी येथील मीरघाट सांगवेद महाविद्यालयाचे वरिष्ठ प्राध्यापक होते.

अयोध्येतील प्रभू राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारीला पार पडला. राम लल्लाच्या अभिषेकाच्या वेळी गर्भगृहात उपस्थित असलेल्या पाच लोकांपैकी पंडित लक्ष्मीकांत दीक्षित हे एक होते. राम मंदिरातील मुख्य पुजारी म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. वैदिक मंत्रोच्चाराच्या वेळी एकूण १२१ पुजारी उपस्थित राहिले होते. दरम्यान, प्रभू राम लल्लाचा अभिषेक करण्याचा बहुमान पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांना मिळाला. पंडित लक्ष्मीकांत दीक्षित हे १७ व्या शतकातील प्रसिद्ध पंडित गागा भट्ट यांचे वंशज होते. पंडित गागा भट्ट यांनी १६७४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अभिषेक केला होता.

हे ही वाचा:

१२ मिराज-२००० लढाऊ विमानांच्या खरेदीबाबत भारत-कतार दरम्यान चर्चा!

अटल सेतूवर भेगा पडल्याचे वृत्त खोटे!

अमेरिकेत किराणा दुकानात झालेल्या गोळीबारात तिघांचा मृत्यू, १० जण जखमी!

इस्रायल-हमासदरम्यान भीषण युद्धाला सुरुवात!

पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांना राम मंदिरात मुख्य आचार्य म्हणून बहुमान मिळाला होता. पंडित दीक्षित यांचे कुटुंब पिढ्यान-पिढ्या काशीमध्ये राहत आहेत. डेक्कन हेराल्डच्या बातमीनुसार, त्यांचा मुलगा सुनील लक्ष्मीकांत दीक्षित म्हणाले की, आमचे पूर्वज पूर्वी महाराष्ट्रात राहत होते आणि तिथे पूजा करत होते.नागपूर आणि नाशिक या संस्थानात त्यांच्या पूर्वजांनी अनेक धार्मिक विधी केले आहेत, असे सुनील दीक्षित यांनी सांगितले.

Exit mobile version