जैन अद्वैत तेरापंथाचे सर्वोच्च प्रमुख आचार्य महाश्रमण यांची संघमुख्यालयाला भेट

जैन अद्वैत तेरापंथाचे सर्वोच्च प्रमुख आचार्य महाश्रमण यांची संघमुख्यालयाला भेट

आज सकाळी पूज्य आचार्य महाश्रमण यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिराला भेट दिली. यावेळी सरसंघसंचालक मोहन भागवत यांनी आचार्यांना या पवित्र स्थळाचा परिसर, इतिहास इत्यादी विषयांची माहिती दिली. त्यानंतर आचार्य महाश्रमण यांनी संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरूजींच्या समाधी स्थानाला देखील भेट दिली. त्यानंतर त्यांनी महर्षि व्यास सभागृहाला देखील भेट दिली.

स्व. दत्तोपंत ठेंगडी सभागृहात साधारणपणे नऊ वाजल्यापासून या कार्यक्रमाला सुरूवात झाली होती. यावेळी सरसंघसंचालक श्री. मोहन भागवत यांनी आचार्यश्रींचे स्वागत करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि तेरापंथाच्या असलेल्या जवळीकीचा उल्लेख केला. ते म्हणाले, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि तेरापंथाचा संबंध कित्येक पिढ्यांचा राहिला आहे. आचार्य महाश्रमणजी यांचा माझ्यावर वरदहस्त आहे, त्यामुळे मी देखील अनेकदा आचार्यांकडे जात असतो. महाराष्ट्रात कोरोनाच्या भयावह स्थितीत आणि लोकांनी वारंवार नाही म्हणून देखील ते माझ्या विनंतीला मान देऊन इथे आले आणि त्यामुळे या परिसराचे पावित्र्य वाढले आहे. आचार्यांनी केलेल्या या कृपेबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.”

हे ही वाचा:

मोदींकडून शेख मुजिबुर यांचा ‘गांधी शांतता पुरस्कार’ शेख रिहाना यांना हस्तांतरित

मोदींच्या बांग्लादेश दौऱ्यामुळे झाला दोन मंदिरांचा जिर्णोद्धार

‘योग’ला खेळ म्हणून मान्यता

यावेळी आचार्यांनी स्वयंसेवकांशी संवाद साधला. त्यांनी स्वयंसेवकांना संयम, सेवा, साहस आणि समता इत्यादी गुण आचरणात आणण्याची प्रेरणा दिली. संघाच्या परिसरात येण्याबाबत ते म्हणाले- “आम्ही नागपूरात संघाच्या परिसरात आलो आहोत. माझी इथे येण्याची इच्छा होतीच. तेरापंथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचा कित्येक वर्षांचा संबंध आहे. भागवतजी माझ्याकडे येत असतात. आज मी आपल्याकडे आलो आहे याचा मलाही आनंद आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक मोठी संघटना आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्राची आध्यात्मिक आणि धार्मिक सेवा करत आला आहे.”

आचार्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिसरातील हेडगेवार यांच्या स्मृती स्थळाला भेट दिल्यानंतर त्यांनी हेडगेवारांच्या जन्मस्थलाला देखील भेट दिली. त्यानंतर ते संघमुख्यालयात आले. याठिकाणी सरसंघसंचालक मोहन भागवातांनी आचार्यांचे श्रद्धापूर्वक स्वागत केले. त्यानंतर सरसंघसंचालक मोहन भागवत आणि आचार्य यांच्या काही काळ विविध विषयांवर चर्चा केली. मोहन भागवतांनी त्यांना कार्यालयाच्या इतिहासाबद्दल वगैरे माहिती दिली.

याठिकाणी सरसंघसंचालकांच्या विनंतीला मान देऊन स्वतः आचार्यांनी भिक्षा मागितली आणि मोहन भागवतांनी स्वतः त्यांना भिक्षा दिली. यावेळी उपस्थित भावूक झाले.

या भेटी दरम्यान तेरापंथ समाजाकडून संघाच्या पुस्तकालयसाठी १२१ पुस्तकांची भेट देण्यात आली.

Exit mobile version