आमिरवर जाहिरातीतून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री किआरा अडवाणी हे एका जाहिरातीमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे.

आमिरवर जाहिरातीतून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री किआरा अडवाणी हे एका जाहिरातीमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. एका खासगी बँकेच्या जाहिरातीत आमिर आणि किआरा यांनी धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी केला आहे. चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांनीही या जाहिरातीवर टीका केली आहे.

“संबंधित जाहिरातीसंबंधी तक्रारी आल्यानंतर ही जाहिरात पाहिली. भारताची संस्कृती आणि रितीरिवाज लक्षात घेता आमिर खानने अशा जाहिराती करणे टाळायला हवे,” अशी टिपण्णी करत त्यांनी आमिर याला आवाहन केले आहे. “यामुळे काही घटकांच्या भावना दुखावत असतील, तर तसे करण्याचा त्याला काहीही अधिकार नाही,” अशी टीका नरोत्तम मिश्रा यांनी केली आहे.

तसेच चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांनीही या जाहिरातीवर टीका केली आहे. “सामाजिक आणि धार्मिक परंपरा बदलण्याची जबाबदारी बँकांवर कधीपासून आली? बँकांमधील भ्रष्टाचार संपवण्यासाठी बँकेने काम करावे. आधी असे काहीतरी करतात आणि मग हिंदू टीका करतात असे म्हणतात,” अशी टीका त्यांनी केली आहे.

हे ही वाचा:

चीनमध्ये शी जिनपिंग यांच्या विरोधात बॅनर झळकले

काश्मीर मुद्द्यावर टिपण्णी करणाऱ्या पाकिस्तानला भारताने फटकारले

मुंबई, दिल्लीत दहशतवादविरोधी बैठक

इराणमधील महसा अमिनी प्रकरण जगासमोर आणणाऱ्या महिला पत्रकाराला अटक

जाहिरातीत काय आहे?

आमिर आणि किआरा हे नवदाम्पत्य विवाह करून परतत असते. त्यावेळी ते गाडीत म्हणतात पाठवणीच्या वेळी आपण दोघेही रडलो नाही. त्यानंतर घरी आल्यानंतर एरवी वधू जसा गृहप्रवेश करते, त्या पद्धतीने आमिर खान गृहप्रवेश करतो आणि पुढे म्हणतो इतक्या वर्षांपासून प्रथा चालत आल्या आहेत त्या अशाच चालत असतात अस का?

या जाहिरातीमुळे लोक आता भावना दुखावत असल्याच्या तक्रारी करत आहेत.

Exit mobile version