राजस्थानमधून रामललासाठी एक अनोखी भेट, पंच धातूपासून बनविलेले धनुष्य, बाण आणि गदा पोहोचली अयोध्येत!

सुमेरपूर येथील श्री सनातन सेवा संस्थानकडून करण्यात आले तयार

राजस्थानमधून रामललासाठी एक अनोखी भेट, पंच धातूपासून बनविलेले धनुष्य, बाण आणि गदा पोहोचली अयोध्येत!

२२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत प्रभू राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू रामाचा अभिषेक करण्यात आला. प्रभू राम मंदिराच्या तयारीच्या सुरवातीपासून देशातील रामभक्त प्रभू रामासाठी भेट म्हणून अनोख्या वस्तू देत आहेत आणि अजूनही भक्तांकडून अनोख्या वस्तू अयोध्येत पोहचत आहेत. तशीच एक अनोखी भेट राजस्थानमधून अयोध्येत आली आहे.

पंचधातूंनी बनवलेली मोठी गदा आणि धनुष्यबाण राजस्थानकडून अयोध्येत पोहोचली आहे. १२ जून रोजी राजस्थानमधील शिवपुरी येथून निघालेली हा विशाल बाण, धनुष्य आणि गदा अयोध्येत पोहचला आहे. अयोध्येला पोहोचलेले धनुष्य, बाण आणि हनुमान गदा श्री रामजन्मभूमी संकुलात ठेवण्यात येणार असून पर्यटकांना त्यांच्या सोयीनुसार ते पाहता येणार आहे.

हे ही वाचा:

राजू असल्याचे भासवून मोहम्मद शब्बीरचा हिंदू मुलीवर बलात्कार!

तीन दिवसांच्या सुट्टीनंतर शेअर मार्केट तेजीत; सेन्सेक्स ७७ हजार पार

एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये ‘भारत’सह ‘इंडिया’ही!

मानवी चूक, सिग्नलकडे दुर्लक्ष, स्वयंचलित सिग्नलिंग यंत्रणेत बिघाड…

पंच धातूपासून बनवलेल्या धनुष्य आणि बाणाचे वजन ११०० किलो आहे, तर हनुमान गदाचे वजन १६०० किलो आहे. या दोन्ही अनोख्या गोष्टी राजस्थानमधील शिवगंज, सुमेरपूर येथे असलेल्या श्री सनातन सेवा संस्थानने तयार केल्या आहेत. १६०० किलोची गदा पाच धातूंपासून २० कारागिरांनी ७५ दिवसांत तयार केली असून त्याची लांबी २६ फूट आणि रुंदी १२ फूट आहे. तर महाकाय धनुष्य ११०० किलोग्रॅमचे बनलेले आहे. धनुष्य आणि बाणाची लांबी ३३ फूट आणि उंची २६ फूट आहे. या दोन्ही भेट वस्तुंना मोठ्या वाहनातून अयोध्येत आणण्यात आले आहे.

Exit mobile version