उत्तर प्रदेशमधील अयोध्येत भगवान श्रीरामाच्या भव्य मंदिराच्या उभारणीचे काम वेगाने पूर्ण होत आहे. उत्तर प्रदेशमधील अयोध्येत २२ जानेवारी २०२४ रोजी ‘न भूतो न भविष्यति’ असा राम लल्लांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्यासाठी देशासह संपूर्ण जगाचे लक्ष या सोहळ्याकडे लागून राहिले आहे. अशातच देशभरातून रामभक्त पावन अशा अयोध्या भूमीवर पोहचणार आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून राम मंदिरासाठी राम भक्त अनेक अनोख्या भेटवस्तू लोक पाठवत आहेत.
पुढील महिन्यात २२ जानेवारीला आयोध्या येथे प्रभु रामचंद्र यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याची संपूर्ण देशवासियांमध्ये मोठी उत्सुकता आहे. प्रत्येकजण आपल्या परीने या सोहळ्यात सहभागी होण्याचा प्रयत्न करत आहेत. याच उत्सुकतेतून नाशिक येथील एक रामभक्त अयोध्येकडे पायी निघाले आहेत. ५२ वर्षीय विरेंद्रसिंह टिळे हे गोदावरी नदीतील पाणी असलेला कलश घेऊन नाशिकमधील पंचवटी येथून पायी पदयात्रा करत आयोध्याकडे निघाले आहेत.
गोदावरीच्या पाण्याने वीरेंद्रसिंह टिळे हे अयोध्या येथे प्रभू श्री रामचंद्र यांचा जल अभिषेक करणार आहेत. नाशिक ते अयोध्या असा त्यांचा तब्बल पंधराशे किलोमीटरचा प्रवास असणार आहे. रोज पहाटे चार वाजेपासून तर रात्री दहा ते अकरा वाजेपर्यंत ते पायी प्रवास करणार आहेत. प्रवासामध्ये त्यांचे ठिकठिकाणी नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे. अशीच एक मुस्लीम तरुणी मुंबईहून अयोध्या गाठण्यासाठी पायी निघाली आहे. शबनम शेख असं या तरुणीचे नाव असून जय श्री राम असा नारा देत ती ही पदयात्रा करत आहे.
हे ही वाचा:
अयोध्येत महर्षि वाल्मिकी विमानतळ, प्रभू रामचंद्रांच्या आगमनाचे चित्र!
ठाकरे गट स्वबळावर लोकसभेची एकही सीट निवडून आणू शकत नाही
लल्लन सिंह यांच्या राजीनाम्यानंतर जेडीयूच्या अध्यक्षपदी नितीश कुमारांची नियुक्ती!
भारतीयांची फाशी रद्द होणे म्हणजे भारताच्या मुत्सद्देगिरीचा मोठा विजय
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येला प्राणप्रतिष्ठापणा केली जाणार आहे. या सोहळ्यासाठी २ हजार ५०० पाहुण्यांची यादी तयार करण्यात आली आहे. त्याशिवाय ४ हजार साधु संतांना देखील या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. तर, २३ जानेवारीपासून मंदिर भक्तांसाठी खुले राहणार आहे. अयोध्येत रामलल्लाच्या अभिषेकापूर्वी तीन दिवस भाविकांना दर्शन घेता येणार नाही.