उत्तर प्रदेशातील फतेहपूरमध्ये एका मुस्लिम व्यक्तीने इस्लाम धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला आहे. अब्दुल जमील असे त्यांचं नाव होते. हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर त्यांचे नाव बदलून श्रवणकुमार ठेवल्याचे सांगितले जात आहे. गुरुवार,२१ जुलैला या व्यक्तीने मंदिरात हिंदू रितीरिवाजांनुसार पूजा केली आणि हिंदू धर्म स्वीकारला. दुसरीकडे मुस्लिम कट्टरतावाद्यांनी विरोध दर्शवला आहे.
धर्मांतर करणारी व्यक्ती शिकोहाबाद येथील सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी आहेत. मंदिरात पूजा केल्यानंतर त्यांनी संपूर्ण हिंदू रितीरिवाजांसह हिंदू धर्म स्वीकारला आहे. ते म्हणतात की, मी सुरुवातीपासून हिंदू धर्माची आवड होती. हिंदू धर्मच्या सर्व सणांमध्ये मी सहभागी होत असे तसेच पूजा आणि आरतीही ते करत असत. नवरात्रीचा उपवासही मी करत होतो. मी अब्दुल जमील असताना कट्टरवाद्यांमुळे मला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते, असंही श्रवणकुमार यांनी सांगितले आहे. लहानपणापासूनच श्रवणकुमार यांना सनातन धर्माची आवड होती. इतकंच नाही तर हा निर्णय घेतल्यावर त्यांच्या नातेवाईकांनी जोरदार विरोध केल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, मी खूप पूर्वीपासून हिंदू धर्म स्वीकारण्याचा प्रयत्न करत होतो पण योग्य वेळ मिळाला नाही. आता योग्य वेळ साधून हिंदू धर्म स्वीकारला असल्याचे श्रवणकुमार म्हणाले आहेत.
हे ही वाचा:
जिलेबीचं उदाहरण देत देवेंद्र फडणवीसांना अमृता फडणवीसांकडून अनोख्या शुभेच्छा
“शिवसैनिक दूर गेल्यावर आदित्य ठाकरेंनी शिवसंवाद यात्रा सुरू केल्या”
२०२३ मध्ये भारताचे ‘गगनयान’ अंतराळात झेपावणार!
शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा २६ जुलैला विस्तार
दोन महिन्यांपूर्वी म्हणजेच मे महिन्यात मध्य प्रदेशमध्ये असाच एक प्रकार समोर आला होता. येथे शेख जफर शेख या मुस्लिम व्यक्तीने इस्लामचा त्याग करून हिंदू धर्म स्वीकारला होता. आता ती व्यक्ती चेतन सिंग राजपूत म्हणून ओळखली जाते. त्यांनी सुद्धा पूजा अर्चा करून हिंदू धर्म स्वीकारला होता. यादरम्यान चैतन्य सिंह राजपूत यांनी सांगितले की, लहानपणापासूनच त्यांचा कल हिंदू धर्माकडे होता.