अयोध्येमध्ये उभारल्या जात असलेल्या भव्य राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. प्राणप्रतिष्ठेसाठी केवळ ८४ सेकंदांचाच मुहूर्त असेल. दुपारी १२ वाजून २९ मिनिटे आठ सेकंदांपासून ते १२ वाजून ३० मिनिटे आणि ३२ सेकंदांपर्यंत हा शुभमुहूर्त असेल. राममंदिर तीर्थ क्षेत्र ट्रस्टने रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी देशभरातील विद्वान आणि चोटीच्या ज्योतिषाचार्यांना प्राणप्रतिष्ठेची वेळ ठरवण्यास सांगितले होते.
यात काशीचे ज्योतिषाचार्य पंडित गणेश्वरशास्त्री द्रविड यांनी काढलेल्या मुहूर्ताला अधिक साजेसा मानून रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा केली जाईल. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने रामलल्लाच्या स्थापनेसाठी अनेक तारखांचे पर्याय दिले होते. त्यामध्ये १७ जानेवारी ते २५ जानेवारीपर्यंतच्या पाच तारखा दिल्या होत्या. मात्र काशीचे ज्योतिषाचार्य पंडित गणेशशास्त्री द्रविड यांनी २२ जानेवारीची तारीख आणि मुहूर्त निवडला. या विद्वान ज्योतिषाचार्यांच्या मते, २२ जानेवारीच मुहूर्त सर्व वाणांपासून दोषमुक्त आहे. ही तारीख आणि हा मुहूर्त अग्निबाण, मृत्यूबाण, चोरवाण, नृपवाण आणि रोगवाणांपासून मुक्त आहे.
हे ही वाचा:
कर्नाटकमधल्या काँग्रेस सरकारला हिजाबचा पुळका; बंदी उठवण्याच्या सूचना
खलिस्तान समर्थकांकडून अमेरिकेतील हिंदू मंदिरावर मोदींविरोधात लिहिला आक्षेपार्ह मजकूर
प्रसिद्ध कवी आणि चित्रकार इमरोज यांचे निधन!
अयोध्यानगरीला छावणीचे स्वरूप
२२ जानेवारी, २०२४ रोजी होणाऱ्या अयोध्येच्या राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर रामनगरीत मोठ्या वेगाने तयारी सुरू आहे. त्यामुळे अयोध्यानगरीत कानाकोपऱ्यातील सुरक्षाव्यवस्था तपासली जात आहे. सीआरपीएफ, यूपीएसएसएफ, पीएसी आणि सिव्हिल पोलिस ठिकठिकाणी तैनात असतील. सुरक्षेसाठी तंत्रज्ञानाचीही मदत घेतली जाणार आहे. एआय आधारित सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने सगळीकडे नजर ठेवली जाणार आहे. अयोध्येत विनापरवानगी ड्रोन उडवण्यावर बंदी असणार आहे.