जौनपूरच्या अटाला मशिदीच्या सर्वेक्षणाच्या निर्णयावर होणार सुनावणी

देवीचे मंदिर असल्याचा दावा

जौनपूरच्या अटाला मशिदीच्या सर्वेक्षणाच्या निर्णयावर होणार सुनावणी

उत्तर प्रदेशमधील संभल आणि बदायूं मशिदींनंतर आता उत्तर प्रदेशातील जौनपूर शहरातील प्रसिद्ध अटाला मशिदीवरील मालकीचा वाद उच्च न्यायालयात पोहोचला आहे. जौनपूरच्या अटाला मशिदीचे सर्वेक्षण केव्हा आणि कसे होणार याचा निर्णय १६ डिसेंबरला होणार आहे. हिंदू पक्षाने मशिदीचे सर्वेक्षण करण्याची मागणी केली होती. तर, मुस्लिम पक्ष याला विरोध करत आहे.

जौनपूरची अटाला मशीद हे पूर्वी अटाला देवीचे मंदिर होते, अशी याचिका स्वराज वाहिनी संघटनेने न्यायालयात दाखल केली होती. मंदिर पाडून मशीद उभारण्यात आली असून यामध्ये हिंदू लोकांना पूजा करण्याची परवानगी द्यावी, अशी याचिका दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी मंगळवारी वरिष्ठ विभाग न्यायालयात सुनावणी होणार होती. अटाला मशिदीच्या सर्वेक्षणासाठी न्यायालयाने १६ डिसेंबरची तारीख निश्चित केली आहे. सर्वेक्षणासाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त असावे आणि घटनास्थळाचे सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

हे ही वाचा : 

चिन्मय दास यांच्या जामीन सुनावणीची तारीख बदलण्याची याचिका फेटाळली

कपूर कुटुंबीय पंतप्रधानांच्या भेटीला!

जोडे पूजण्यासाठी, जोडेपुशे म्हटले; जोड्यांनी मार खाल्ला…

काबुलमध्ये झालेल्या स्फोटात अफगाणिस्तानचे निर्वासित मंत्री ठार

उत्तर प्रदेशातील जौनपूर मशिदीच्या ठिकाणी कन्नौजचा राजा विजयंचद्र याने अटला देवीचे मंदिर बांधले होते, असे हिंदू पक्षकारांचे म्हणणे आहे. १४ व्या शतकात फारोह शाह तुघलकाने मंदिर पाडून तिथे मशीद बांधली आणि तिथे हिंदूंना पूजाअर्चा करण्यास विरोध केला. हिंदू बाजूने असा दावा केला आहे की, या इमारतीत अजूनही हिंदू स्थापत्य शैलीचे पुरावे आहेत जे प्रथा आणि परंपरा प्रतिबिंबित करतात. यासंदर्भात स्वराज वाहिनी संघटनेने जौनपूरच्या दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली.

Exit mobile version