लालबागच्या राजाच्या चरणी कोट्यवधींचे दान

भाविकांनी सोने आणि चांदीही केली अर्पण

लालबागच्या राजाच्या चरणी कोट्यवधींचे दान

मुंबईतील गणेशोत्सवात लालबागच्या राजाला विशेष महत्त्व असून लालबागचा राजा हा नवसाला पावणारा गणपती आहे अशीही त्याची ख्याती आहे. दरवर्षी लालबागच्या राजाच्या चरणी लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. भाविकांकडून भरभरुन दान दिलं जातं. या दानाची मंडळाकडून मोजदाद करण्यात येते आणि लालबागच्या राजाच्या दानपेटीत आलेल्या सोने आणि चांदीचा लिलाव केला जातो. शिवाय त्यामधून जी रक्कम जमा होते, त्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात.

यंदाच्या वर्षीही गणेश भक्तांनी लालबागच्या चरणी कोट्यवधी रुपयांचे दान केले आहे. दहा दिवसांमध्ये लालबागच्या राजाच्या चरणी पाच कोटी सोळा लाख रुपये रोख रक्कमेचं दान आलं आहे. तर साडेतीन किलो सोनं आणि ६४ किलो चांदी यावेळी दान करण्यात आली आहे. माहितीनुसार, पहिल्याच दिवशी भाविकांकडून केलेल्या दानामध्ये ४२ लाख रुपयांची रोख रक्कमेची नोंद करण्यात आली. तर १९८.५५० ग्रॅम सोने आणि ५४४० ग्रॅम चांदीच्या वस्तू राजाच्या चरणी दान करण्यात आल्या होत्या.

पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जवळपास २० लाखांहून अधिक भाविक आले असल्याचा अंदाज मंडळाकडून व्यक्त करण्यात येत आहे. गणपतीच्या आदल्या दिवशीच लोकांनी दर्शनासाठी रांग लावायला सुरुवात केली होती. पहिल्याच दिवशी सामान्य नागरिकांसह अनेक बॉलिवूड कलाकार, राजकीय नेत्यांनीही लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. पुढील सर्व दिवस गणेश भक्तांनी राजाचे दर्शन घ्यायला मोठी गर्दी केली होती.

हे ही वाचा..

तिरुपती लाडू प्रकरणात ‘अमूल’चे नाव घेतल्याबद्दल तक्रार दाखल

प्रसादाच्या लाडूला पुन्हा मिळाले पावित्र्य

हवाई दलाच्या प्रमुख पदी एअर मार्शल अमर प्रीत सिंग यांची नियुक्ती

तिरुपती लाडू प्रकरण ; पुरवठादार काळ्या यादीत

दरम्यान, लालबागच्या राजाला अनंत अंबानी यांनी २० किलो सोन्याचा मुकूट भेट दिला होता. या मुकूटाची किंमत २० कोटी रुपये आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आलं त्याआधी राजाचा मुकूट काढून ठेवण्यात आला. हा सोन्याचा मुकूट आता लॉकरमध्ये ठेवण्यात आला आहे.

Exit mobile version