राम मंदिरासाठी भेट म्हणून भाविकाने दिले १०१ किलो सोने!

२०२३ पर्यंत मंदिरासाठी तीन हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त देणग्या मिळाल्या

राम मंदिरासाठी भेट म्हणून भाविकाने दिले १०१ किलो सोने!

अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सजले आहे.राम मंदिरासाठी देशातील आणि जगभरातील कोट्यवधी भाविकांनी आपल्या क्षमतेनुसार देणगी दिली आहे.दरम्यान, राम मंदिरासाठी सर्वात मोठी देणगी सुरतच्या एका हिरे व्यापाऱ्याने दिली आहे.त्यांनी राम मंदिरासाठी तब्बल १०१ किलो सोने पाठवले आहे.

दिलीप कुमार व्ही लाखी असे देणगीदाराचे नाव आहे.दिलीप कुमार हे सुरतमधील सर्वात मोठ्या हिऱ्याच्या कारखान्यांपैकी एकाचे मालक आहेत.गुजरातमधील वृत्तानुसार, राम मंदीरात लावण्यात आलेल्या १४ सुवर्णद्वारांसाठी जे सोने लागले ते दिलीप कुमार यांनी पाठवले.तब्बल १०१ किलो सोने त्यांनी पाठवले.रामजन्मभूमी ट्रस्टला मिळालेली ही सर्वात मोठी देणगी असल्याचे मानले जात आहे.

हे ही वाचा:

तामिळनाडू सरकारने प्राण प्रतिष्ठाच्या थेट प्रक्षेपणावर बंदी घातली?

जय श्रीरामच्या घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या शिक्षकाला अटक

अद्भूत! १५० वर्षांपूर्वीच राम मंदिर प्राणप्रतिष्ठेची तारीख ठरली होती!

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा २२ जानेवारीला व्यस्त कार्यक्रम

रामजन्मभूमी मंदिराचे दरवाजे, गर्भगृह, त्रिशूळ, डमरू आणि खांब पॉलिश करण्यासाठी सोन्याचा वापर केला जात आहे.गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासोबतच मंदिराच्या तळमजल्यावर १४ सुवर्णद्वार बसविण्यात आले आहेत.

दुसरी सर्वात मोठी देणगी कथाकार मोरारी बापूंच्या अनुयायांनी दिली आहे.त्यांनी राम मंदिरासाठी १६.३ कोटी रुपये दिले आहेत.याशिवाय सुरतचे हिरे व्यापारी गोविंदभाई ढोलकीया यांनी ११ कोटी रुपये मंदिराला समर्पित केले आहे.ढोलकीया हे श्री रामकृष्ण एक्सपोर्टसचे संस्थापक आहेत.दरम्यान, २०२३ पर्यंत राम मंदिरासाठी ३ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त देणग्या मिळाल्या होत्या. मंदिराच्या बांधकामावर आतापर्यंत एक हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत.मंदिराचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत सुमारे ३०० कोटी रुपये अधिक खर्च होतील असा अंदाज वर्तवला जात आहे.

 

Exit mobile version