कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठांत ५२ गायीचं मृत्यू झाल्याने सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नुकताच या मठांत पंचमहाभूत महामंगल सोहळा लोकोत्सव सुरु झाला होता. त्यासाठी मोठ्या प्रमाणांत अन्न बनवण्यात आले होते. तिकडे ही घटना घडली आहे. शिळ्या अन्नातून विषबाधा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आणखी ३० गाई या गंभीर असल्याचे बोलले जात आहे.
या पंचमहाभूत महामंगल लोकोत्सवाचे उदघाटन नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर गुरुवारी गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी सुद्धा मठाला भेट दिली होती. मठाच्या ठिकाणी हजारोंच्या संख्येने गायी असून सध्या त्याच जनावरांचे प्रदर्शन असल्यामुळे येथे भरपूर प्रमाणात जनावरे आणण्यात आली होती.
हे ही वाचा:
भारत ते गयाना लवकरच थेट विमानसेवा
मैदानी चाचणी दरम्यान दुसऱ्या भरती उमेदवाराचा मृत्यु
जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांचा पुतळा जाळण्यास सांगितला
गायीच्या मृत्यूचा शोध घेणार
दरम्यान, या ठिकाणी गाईंचा मृत्यू झाल्याची अधिकृत घोषणा पशुसंवर्धन विभागाचे उपयुक्त डॉक्टर वाय. ए. पठाण यांनी दिली आहे. या जनावरांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला यांची माहीती फॉरेन्सिक विभागाकडून घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सध्या या ठिकाणी इतर जनावरांवर उपचार सुरु आहेत. मठाचे अधिपती काडसिद्धेश्वर स्वामी यांना विचारले असता त्यांनी सांगितले के, कणेरी मठांत ही अत्यंत दुर्दैवी घटना असून हा एक अपघात आहे. हे जाणीवपूर्वक झालेलं काम नसून हे अज्ञानापोटी झालेले कृत्य आहे. आम्ही रस्त्यांवरून गाई आणून त्यांचा सांभाळ करणारे लोक आहोत. म्हणूनच आम्हाला याचे प्रचंड मोठे दुःख आहे. दरम्यान या सर्व प्रकारामुळे पंचमहाभूत महामंगल सोहळ्याला गालबोट लागल्याची चर्चा आता होत आहे.