दोन वर्षांनंतर कोरोना काळ लोटल्यानंतर आता गणेशभक्तांना गणरायांच्या आगमनाची आस लागून राहिली आहे. त्यातच शिंदे-फडणवीस सरकारने सर्व सणांवरील निर्बंध हटवले आहेत. त्यामुळे पूर्वीच्याच उत्साहात गणेशोउत्सव साजरा करण्यासाठी सर्व भक्तजन सज्ज झाले आहेत. गणपती बाप्पाचे वेगवेगळ्या कृतीतून मूर्तीचे कलाविष्कार कलाकार मंडळी दाखवत आहेत. गणेशोत्सव घरगुती आणि सार्वजनिक स्वरुपात साजरा केला जातो. तो साजरा करीत असताना पर्यावरणपूरक होईल, तसेच या कालावधीत पर्यावरणाच्या संरक्षण आणि संवर्धनाची काळजी घेतली जाईल, हे पाहणे आपल्या सर्वांचे नैतिक आणि राष्ट्रीय कर्तव्य आहे.
गणेशोत्सव काळात खूप मोठ्या प्रमाणात नागरिक थर्माकॉल, प्लॅस्टिकचा वापर करून पर्यावरणाला हानी पोहोचवतात. मात्र मुंबई अंधेरी येथील पवई भागात कलाकार चेतन राऊत यांनी यंद ७५ हजार मातीच्या रंगीत पणत्यापासून गणपती बाप्पाची ५० फूट लांब आणि ४० फूट रुंद प्रतिमा साकारून राऊत यांनी विक्रमाच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. त्याच्या कलाकृतीची दखल विश्वविक्रमासाठी घेण्यात आली आहे. सदर बाप्पाची प्रतिमा पवई येथील आयआयटीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सिनेमा ग्राउंडमध्ये कलाप्रेमींना २० ऑगस्टपर्यंत पाहता येणार आहे.
हे ही वाचा:
हरिहरेश्वर येथे अज्ञात बोट आणि एके ४७ सापडल्याने खळबळ
‘भाजपाच्या मतांवर निवडून यायचे आणि उगाच म्हणायचे आमचा गड’
रोहिंग्यांचा पुळका मोदींचा दणका
गणपती बाप्पाच्या प्रतिमेचे पोट्रेट साकारण्यासाठी राऊत यांना दोन दिवस लागले. त्यासाठी त्यांनी १२ सहकाऱ्यांची मदत घेऊन ही कृती साकारली. या प्रतिमेसाठी ६ रंगाच्या विविध पणत्यांचा वापर केला आहे. पवईतील समाजसेवक चंदन चित्तरंजन शर्मा यांच्या प्रयत्नाने पोट्रेर्ट साकारण्यात आले आहे. राऊत यांनी आतापर्यंत अनेक प्रकारच्या कलाकृती साकारल्या आहेत. सध्या पवई येथील त्यांची ही १५ वी कृती असून, भारतातील पहिले पोट्रेट आहे. एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया आदी विक्रमासाठी त्यांची नोंद करण्यात आली आहे, असे राऊत यांनी सांगितले.