23 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरधर्म संस्कृतीवारकऱ्यांना राज्य सरकारकडून भेट! श्रीक्षेत्र पंढरपूर यात्रेकरिता ५ हजार विशेष गाड्या

वारकऱ्यांना राज्य सरकारकडून भेट! श्रीक्षेत्र पंढरपूर यात्रेकरिता ५ हजार विशेष गाड्या

आषाढी एकादशीनिमित्त शिंदे फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Google News Follow

Related

आषाढी एकादशीनिमित्त हजारोच्या संख्येने वारकरी आणि भाविक पंढरपूरला येत असतात. वारकऱ्यांना कोणत्याही अडथळ्याविना पंढरपुरला जाता यावे, यासाठी शिंदे फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर यात्रेकरिता वारकऱ्यांसाठी राज्यभरातून विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित निर्देश दिले आहेत.

आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर यात्रेकरिता पाच हजार विशेष गाड्या सोडण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. २५ जून ते ०५ जुलै या कालावधीत या विशेष गाड्या धावणार असून वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी (२७ जून रोजी) २०० अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

पंढरपूर आषाढी यात्रेसाठी एसटी महामंडळाने बस सेवेसाठी केलेल्या नियोजनाचा आढावा मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला. यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्यासह महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

पंढरपूर आषाढी यात्रा हा महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. यामध्ये एसटीच्या प्रवाशी वाहतुकीला महत्त्व आहे. याकाळात एसटीकडून आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा प्रवाशांना आणि वारकऱ्यांना दिल्या जाव्यात, भाविक-प्रवाशांना त्यांच्या गावापासून थेट पंढरपूरपर्यंत घेऊन जाणे आणि विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर सुखरूपपणे घरी आणून सोडण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी एसटीवर असल्याचं मत यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी मांडले.

हे ही वाचा:

अन्य धर्मीयांचा त्र्यंबकेश्वर मंदिर प्रवेश गंभीर, एसआयटी नेमणार

‘मशिदीत पुरलेल्या कृष्णाच्या मूर्ती खोदून काढा’

‘जीना यहाँ, मरना वहाँ’ म्हणत न्यायाधीशांनी दिला निरोप

उत्तराखंडमध्ये ३०० हून अधिक बेकायदा मझार जमीनदोस्त

आषाढी यात्रेसाठी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या सहा प्रदेशातून गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. औरंगाबाद प्रदेशातून १ हजार २००, मुंबई ५००, नागपूर १००, पुणे १ हजार २००, नाशिक १ हजार तर अमरावती येथून ७०० अशाप्रकारे यात्रेसाठी विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

तसेच यात्रेसाठी पर्यटकांची एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये, यासाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भीमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) आणि विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा