राम मंदिराचे ४० टक्के काम पूर्ण, या दिवशी भाविकांना घेता येणार दर्शन

राम मंदिराचे ४० टक्के काम पूर्ण, या दिवशी भाविकांना घेता येणार दर्शन

अयोध्येतील श्रीराम मंदिराचे बांधकाम वेगात सुरू असून गेल्या दोन वर्षांत मंदिराचे ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. श्रीरामजन्मभूमी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दोन वर्षांपूर्वी अयोध्येत राममंदिराचे भूमिपूजन झाले होते. त्यानंतर मंदिराचे ४० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे, अशी माहिती चंपत राय यांनी दिली आहे.

मंदिराचे बांधकाम वेगाने सुरू असून आसपासच्या परिसरातील रस्ते रुंदीकरणाचे कामही सुरू आहे. या मंदिराच्या पायाचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. श्रीराम मंदिराचे काम लवकरच पूर्ण होईल आणि डिसेंबर २०२३ पासून जगभरातील भाविक प्रभू श्रीरामाचे दर्शन घ्यायला अयोध्येत येतील, असा विश्‍वास चंपत राय यांनी व्यक्त केला आहे.

हे ही वाचा:

भारताचे ‘हार्दिक’ अभिनंदन; पाकिस्तानला नमविले

‘स्वातंत्र्यदिनानिमित्त सामुहिक शक्तीचे घडले दर्शन’

गृहमंत्री अमित शहा मुंबईत ‘या’ गणेशोत्सवाला भेट देणार

Twin Tower Demolition: काही सेकंदात कोसळले भ्रष्टाचाराचे टॉवर

चंपत राय हे स्वतः अयोध्येत राहून कामावर देखरेख ठेवत आहेत. हे मंदिर आठ एकर परिसरात असणार आहे. तर परिसरातच इतर देवतांची मंदिरे असणार आहेत. मंदिराचा गर्भगृह बांधण्यासाठी राजस्थानमधील मकराना येथून संगमरवर आणण्यात येणार आहे.

Exit mobile version