अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या राजभिषेकाला आज ३५० वर्षे पूर्ण होत असून तो सोहळा हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या दुर्गदुर्गेश्वर रायगडावर साजरा होत आहे. शिवभक्तांमध्येही त्यामुळे उत्साहाचं वातावरण आहे. यानिमित्ताने रायगडावरची तयारी पूर्ण झाली आहे. दुर्गराज रायगडवर ६ जून रोजी शिवराजाभिषेक दिन साजरा केला जातो.
हिंदवी स्वराज्य म्हणजे सार्वभौम राज्याची स्थापना आहे हे या शिवराज्याभिषेकामुळे दिसून आले. शिवाजी महाराजांनी राजभिषेकाच्या निमित्ताने स्वतंत्र राज्याची ‘राज्याभिषेक शक’ ही नवीन कालगणना सुरू केली. आर्थिक व्यवहारासाठी शिवराई आणि होन अशी मोडी (मराठी) लिपीतील नाणी चलनात आणली.
महाराष्ट्रातील गोरगरीब सर्वसामान्य, अठरापगड जातीच्या मावळ्यांच्या साहाय्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल, इंग्रज, पोर्तुगीज यांच्याविरोधात स्वतंत्र लढा सुरु केला. गुलामगिरीमध्ये खितपत पडलेल्या महाराष्ट्रातील रयतेच्या मनात या राजभिषेकामुळे आत्मविश्वास निर्माण झाला. विविध जाती-धर्मातील लोकांना एकत्र करत छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे स्वराज्य उभारले.
या राजभिषेकाच्या ऐतिहासिक सोहळ्यासाठी असंख्य शिवभक्त रायगडावर एकत्र येणार आहेत. त्यासाठी पोलिसांनी शिवभक्तांना आवाहन केले आहे.
हे ही वाचा:
मुस्लिम महिलांनी मतं तर दिली, आता ‘गॅरंटी कार्ड’ घेण्यासाठी काँग्रेस कार्यालयाबाहेर रांगा
‘जिंकलो आम्ही अन उड्या मारत आहेत दुसरे’
हिंदुत्व सोडणाऱ्या उबाठाचे उमेदवार मुस्लिम मतांमुळे निवडून आले!
मला मोकळं करा… राज्याच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची फडणवीसांची इच्छा!
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त लाखोंच्या संख्येने शिवभक्त रायगडावर येत असतात. त्यानिमित्ताने पोलीस प्रशाननाकडूनही संपूर्ण खबरदारी घेतली जात आहे. रायगडावरील रोपवे फक्त प्रशासन आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीच उपलब्ध राहणार आहे. तसेच इतरांसाठी नाणेदरवाजा खुला राहणार आहे.
पोलीस प्रशासनाकडून आवाहन
दरम्यान उद्या गडावर येणाऱ्या शिवभक्तांनी सूचनांचे पालन करणे गरजेचं असल्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. राज्याभिषेकाचा दिवस हा उत्साह वाढणारा दिवस आहे पण सकाळीच कोणी येण्याचा अट्टाहास करु नये असं आवाहनही पोलीस प्रशासनाने केलं आहे.