हिंदू आध्यात्मिक मेळाव्यात दुसऱ्या दिवशी ‘युग नायक विवेकानंद’, आचार्य वंदन असे कार्यक्रम

मुंबईतील गोरेगाव येथे मेळाव्याचे आयोजन

हिंदू आध्यात्मिक मेळाव्यात दुसऱ्या दिवशी ‘युग नायक विवेकानंद’, आचार्य वंदन असे कार्यक्रम

हिंदू आध्यात्मिक एवं सेवा संस्थानच्या वतीने ९ ते १२ जानेवारी या कालावधीत मुंबईत भव्य हिंदू आध्यात्मिक एवं सेवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मूल्यवर्धन म्हणजेच राष्ट्रनिर्माण हे या कार्यक्रमाचे बोधवाक्य आहे. महाराणी अहिल्याबाई होळकर मैदान, लक्ष्मी पार्क, बांगुर नगर, महाराजा अग्रसेन मार्ग, गोरेगाव (प), मुंबई ४००१०४ येथे हा मेळावा भरवण्यात आला आहे. ‘न्यूज डंका’ या कार्यक्रमाचा मीडिया पार्टनर आहे.

भव्य हिंदू आध्यात्मिक एवं सेवा मेळाव्याच्या पहिल्या दिवसाला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर मेळाव्याच्या दुसऱ्या दिवशीही अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७.१५ वाजता योग साधनेने दिवसाची प्रसन्न सुरुवात झाल्यानंतर आचार्य वंदन हा कार्यक्रम पार पडणार आहे. दुपारी २ ते ४ या वेळेत महाविद्यालय युवा स्पर्धा आहेत. तर, ५ ते ६ या वेळेत राक कीर्तन- इस्कॉन यांचे कीर्तन होणार आहे. ५.३० वाजता श्री विष्णू सहस्रनाम आणि ६.३० वाजता गंगा आरती पार पडणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून सुधीर झुनझुनवाला उपस्थित असणार आहेत. हे सर्व कार्यक्रम गुरुपुत्र सभागृह येथे होतील. ७.३० वाजता स्वामी विवेकानंद मंडप येथे ‘युग नायक स्वामी विवेकानंद’ यावर कार्यक्रम पार पडणार आहे. शेखर सेन हे या कार्यक्रमाचे प्रस्तुतकर्ते असणार आहेत. गांधार ग्रुपचे अध्यक्ष रमेशजी पारीख, मुख्य अतिथी सीए के सी जैन, अतिथी भावेश माथुरिया, सीए अरुण बधैरिया उपस्थित असणार आहेत. मेळाव्याच्या दुसऱ्या दिवशी सर्वांनी सहपरिवार उपस्थित राहण्याचे आवाहन हिंदू आध्यात्मिक एवं सेवा संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

Exit mobile version