अयोध्येतील राम मंदिरावर १८०० कोटी खर्च होणार

आयोधीयतील राम मंदिर उभरण्यासाठी १८०० कोटी पेक्षा जास्त पैसे खर्च होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अयोध्येतील राम मंदिरावर १८०० कोटी खर्च होणार

उत्तर प्रदेश राज्यातील सरयू नदीच्या काठावर अयोध्या शहर वसलेले आहे. या अयोध्यामध्ये ऐतिहासिक राम मंदिर उभारणीचे काम प्रगतिपथावर सुरु असून, त्यासाठी १८०० कोटी रुपये खर्च करावे लागतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मागच्या वर्षी ५ ऑगस्ट २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन करण्यात केले होते. त्यानंतर मंदिराचे आतापर्यंत ४० टक्के काम पूर्ण झाले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने राम जन्मभूमीविषयी आदेश दिल्यानंतर ट्रस्टची स्थापना करण्यात आली १५ सदस्यांची निवड करण्यात आली असून महंत नृत्य गोपाल दास हे या ट्रस्टीचे अध्यक्ष आहेत. कामकाज संदर्भात फैजाबाद येथील शासकीय अतिथीगृहात रविवारी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र प्रमुखांच्या बैठका पार पडल्या. मंदिरातील संकुलात हिंदू धर्मातील विविध महान साधू-संतांच्या प्रतिमा बसविण्यात येणार आहेत. त्यामध्ये महर्षी विश्वामित्र, महर्षी वाल्मिकी, महर्षी अगस्ती, निषादराज, जटायू आणि शबरीमाला यांच्या प्रतिमा बसविण्यात येणार आहेत. अशी माहिती ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी प्रसार माध्यमांना दिली.

मंदिराच्या सुरक्षा संदर्भातील जबाबदारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे सोपवण्यात येणार असल्याचा निर्णय ट्रस्टच्या बैठकीत पार पडला. तसेच मंदिर बांधकामाचा अहवाल वेळोवेळी पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवण्यात येणार आहे. तसेच मंदिरांचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी डिसेंबर २०२३ पर्यंतचा कालावधी लागेल. तसेच २०२४ मध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी प्रभू रामचंद्रांची मूर्ती गर्भगृहात विधिवत स्थापन करण्यात येणार आहे. असा अंदाज राय यांनी व्यक्त केला आहे.

हे ही वाचा:

इलेक्ट्रिक स्कूटर रिचार्जिंग युनिटला लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू

मुख्यमंत्री शिंदेंकडून ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ जाहीर

पाकिस्तान विरुद्धच्या विजयाचा आनंद श्रीलंकेपेक्षा अफगाणिस्तानला जास्त

सोनाली फोगाट प्रकरणात आता सीबीआयची उडी

तसेच राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या बांधणीसाठी १८०० कोटी खर्च केवळ मंदिर उभारण्यासाठी येणार आहे. तसेच या मंदिराखेरीज अनॆक छोटी-मोठी मंदिरे व इमारतीदेखील उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी आणखी वेगळी आर्थिक तरदूत करावी लागणार आहे.

Exit mobile version