26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरधर्म संस्कृतीजालन्यातील १२ कुटुंबांची हिंदू धर्मात घरवापसी

जालन्यातील १२ कुटुंबांची हिंदू धर्मात घरवापसी

Google News Follow

Related

औरंगाबादच्या पैठण येथील नाथमंदिरात शनिवारी २५ डिसेंबरला ५३ जणांनी हिंदू धर्म स्वीकारला. जालना जिल्ह्यातील मंठा येथील १२ कुटुंबातील ५३ महिला आणि पुरुषांनी ख्रिश्चन धर्माचा त्याग करुन विधीवत हिंदू धर्म स्वीकारला. ब्राह्मण सभेने यासाठी पुढाकार घेतला. तर पैठणच्या वेदशास्त्र संपन्न पंडितांनी हिंदुधर्म शास्रानुसार या धर्मविधीचे पौरोहित्य केले. नाथवंशज आणि धर्मजागरण विभाग यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

‘जालना जिल्ह्यातील मंठा येथील १२ कुटुंबातील ५३ ख्रिश्चन महिला आणि पुरुषांनी ख्रिश्चन धर्माचा त्याग करून हिंदू धर्मवापसी करता येईल का? असे विचारले होते. त्यांनी पुन्हा हिंदु धर्मात येण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर पैठणच्या ब्राह्मण सभेच्या वतीने पुढाकार घेण्यात आला. स्वेच्छेने धर्मांतर करायचे असल्याने धार्मिक विधी करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार नाथमंदिरात शांतीब्रम्ह नाथमहाराजांच्या समाधीसमोर विधीवत ‘धर्मवापसी’ सोहळा पार पडला. यावेळी संत एकनाथ महाराज यांचे १४ वे व १५ वे वंशज यांच्यासह पैठणचे वेदशास्त्र संपन्न ब्रम्हवृंदांची उपस्थिती होती, असे पैठण ब्राह्मण सभेचे अध्यक्ष सुयश कमलाकर शिवपुरी यांनी सांगितले.

हे ही वाचा:

सनी लिओनीच्या त्या गाण्यात होणार बदल

राज्यपाल घेणार विधानसभा अध्यक्षपदाबाबत निर्णय

सावरकरप्रेमींचा विजय; सावरकर स्मारक अध्यक्षपदी प्रवीण दीक्षित यांची बहुमताने निवड

सास भी…मधील बहु बनली सासु!

हा धर्मवापसीचा सोहळा संत एकनाथ महाराज समाधी येथे धार्मिक विधिवत पार पडला. हिंदू धर्मात प्रवेश केलेल्या या सर्व परिवारांचे स्वागत आणि पूजन हभप नाथवंशज रावसाहेब महाराज गोसावी, नाथवंशज रघुनाथ महाराज गोसावी (पालखीवाले) आणि किर्तनमहर्षी प्रफुल्लबुवा तळेगावकर महाराज यांनी केले.

या १२ कुटुंबांनी हिंदू धर्मात प्रवेश केल्यानंतर मंठा तालुक्यातील आणखी २२ ख्रिस्ती कुटुंबातील जवळपास ६५ महिला आणि पुरुष ख्रिश्चन धर्माचा त्याग करून हिंदू धर्मात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या कुटुंबियांच्या इच्छेनुसार ५ जानेवारी रोजी धार्मिक मुहूर्तावर पैठण येथील नाथमंदिरातच या धर्मांतर विधीचे आयोजन करण्यात आले आहे. ब्राह्मण सभेच्या पुढाकाराने ही ‘धर्मवापसी’ केली जाणार असल्याची माहिती पैठण ब्राह्मण सभेचे अध्यक्ष सुयश शिवपुरी यांनी दिली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा