महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध देवस्थान शिर्डी येथील साई बाबा संस्थानाने भक्तांसाठी मोठी आनंदाची बातमी दिली आहे. त्यामुळे आता भक्तांना तासंतास दर्शन घेण्यासाठी रांगेत उभ राहण्याची आवश्यकता नसून, साईबाबांच्या दर्शनासाठी तासनतास दर्शनरांगेत उभे राहण्यापासून भक्तांची आता सुटका होणार आहे. साईबाबा संस्थानने तब्बल १०९ कोटी रुपये खर्चून बांधलेली ‘अत्याधुनिक दर्शनरांग काॅम्लेक्स’ लवकरच भक्तांसाठी सुरु होणार आहे.
साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज देशभरातून हजारो भाविक हजेरी लावत असतात. त्यांना साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी तासनतास दर्शनरांगेत उभे राहावे लागते. आता मात्र नव्याने बांधण्यात आलेल्या दर्शनरांगेत भक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे. अत्याधुनिक दर्शनरांग ही संपूर्ण वातानुकूलीन असून, साईभक्तांच्या सुरक्षेची विशेष काळजी यात घेतली जाणार आहे. शिर्डीत आल्यानंतर भक्तांना दर्शनपास काऊंटर, लाॅकर, चप्पल स्टॅण्ड, लाडू काऊंटर, डोनेशन काऊंटर, ऊदी स्टाॅल तसेच टाॅयलेट अशा अनेक गोष्टींची शोधाशोध करावी लागते. आता मात्र, एकाच छाताखाली सर्वकाही सुविधा करण्यात आल्या आहेत.
हे ही वाचा:
मुंबईतील सर्व पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट होणार
‘आंतरधर्मीय विवाहाला विरोध नाही, मात्र काही ठिकाणी षडयंत्र केले जाते’
लोकायुक्त कायद्याचे शस्त्र विरोधकांना पेलवेल काय?
दर्शन कॉम्प्लेक्सची क्षमता ११ हजार भाविकांची
साईबाबा संस्थानच्या या नव्याने बांधण्यात आलेल्या या आत्याधुनिक दर्शनरांग काॅम्लेक्समध्ये एका वेळी ११ हजार भाविक बसू शकतील असे नियोजन करण्यात आले आहे.तर या कॉम्प्लेक्समध्ये वातानुकूलीन हाॅल ही बनविण्यात आले आहेत. जिथे भक्तांना बसता येईल आणि भक्तिमय वातावरणात दर्शन कसे दिले जाईल, याची विशेष काळजी घेण्यात शिर्डीच्या साईबाबा संस्थान कडून करण्यात येत आहे, असे शिर्डी साईमंदिरचे कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी म्हटले आहे.