ज्ञानवापी परिसरात १० तळघर आणि एक विहीर

तळघरांचे मॅपिंग करण्यात आले असून त्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे

ज्ञानवापी परिसरात १० तळघर आणि एक विहीर

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या सर्वेक्षणाआधी ज्ञानवापी परिसरात नेमकी किती तळघरे आहेत, याचा नीटसा अंदाज नव्हता. मशिदीच्या खाली चार ते पाच तळघर असल्याचा दावा कोणी करत असे. मात्र भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने जीपीआर ग्राऊंड पेनिट्रेटिंग रडारचा वापर करून मशिदीच्या खाली असणाऱ्या एकूण तळघरांचा शोध घेतला, तेव्हा तेथे १० तळघरे आढळली. या तळघरांचे मॅपिंग करण्यात आले असून त्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे.

जी तळघरे दिसतात, त्यातील एकाला हिंदू पक्ष व्यासजींचे तळघर म्हणतात तर, दुसऱ्या तळघरावर मुस्लिम पक्षांचा ताबा आहे. मात्र भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या म्हणण्यानुसार, ज्ञानवापीच्या उत्तर भागात पाच चेंबर आणि दक्षिण भागात पाच चेंबर आहेत. याच १० चेंबरना तळघर मानले जात आहे. सध्या यापैकी एका तळघरात जाता येते. तिथे धार्मिक विधीही होतात.

तर, व्यासजींच्या तळघराच्या बाजूला असणाऱ्या तिसऱ्या तळघरात एक विहीरही आहे. अन्य आठ तळघरे भिंतींनी बंद करून टाकण्यात आली आहेत. त्यात आतमध्ये माती भरलेली आहे. या तळघरांत जाण्यासाठी कोणताही दरवाजा नाही. कारण यात माती भरून याचे दरवाजांची जागा भिंतीने भरून टाकण्यात आली आहे. या तळघरांत जुन्या ज्ञानवापी मंदिराची रहस्ये दडली आहेत, असा हिंदू पक्षाचा दावा आहे. यात हिंदू देवी-देवतांच्या मुर्ती, शिवलिंग असू शकतात, असा त्यांचा विश्वास आहे. मात्र याबाबतची माहिती या अहवालात नाही.

हे ही वाचा:

‘असा मुलगा मेलेलाच बरा…’

पेमेंट्स बँकेचे अध्यक्ष विजय शेखर यांचा पदाचा राजीनामा!

तिसऱ्या पेन ड्राईव्हची प्रतिक्षा…

आरएसएस, मोदीविरोधाची गरळ ओकणाऱ्या निताशा कौलला भारताबाहेर हाकलले

मात्र ज्ञानवापी परिसरातील मशिद ही हिंदू मंदिराच्या वर बनवली गेली आहे. त्याचा पाया हिंदू मंदिराचा आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत बंद पडलेल्या आठ तळघरांमध्ये मंदिराशी संबंधित अवशेष आढळतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. परंतु पुरातत्व सर्वेक्षण विभागाने खोदकाम केल्यानंतरच त्यातील तथ्य समोर येईल.

Exit mobile version