राम मंदिरासाठी देशभरातून ₹१५११ कोटींचा निधी जमा

राम मंदिरासाठी देशभरातून ₹१५११ कोटींचा निधी जमा

उत्तर प्रदेशच्या अयोध्येत राम मंदिर निर्मिती व व्यवस्थापन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट यांच्या खात्यात ₹ १,५११ कोटी रुपये जमा झाले आहेत. असे ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी यांनी शुक्रवारी सांगितले.

“अयोध्येत भव्य राममंदिराच्या उभारणीसाठी संपूर्ण देशातून निधी संकलीत होत आहे. आमच्या देणगी मोहिमेदरम्यान देशभरातील चार लाख गावे आणि ११ कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचे आमचे लक्ष्य आहे. आम्ही १५ जानेवारीपासून देणगी मोहीम राबवित आहोत आणि २७ फेब्रुवारीपर्यंत ही मोहीम सुरूच राहील. मी या मोहिमेचा एक भाग म्हणून सूरत येथे आहे.  ४९२ वर्षानंतर लोकांना पुन्हा एकदा धर्मासाठी काहीतरी करण्याची संधी मिळाली आहे.” असे गोविंदगिरी महाराज यांनी सांगितले. आत्तापर्यंत राम मंदिर बांधण्यासाठी ₹१५११ कोटींचा निधी गोळा झाला आहे अशी माहितीही त्यांनी दिली.

९ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयातील खंडपीठाच्या पाच न्यायाधीशांनी राम लल्लाच्या बाजूने निकाल दिला आणि सांगितले की २.७ एकरांवर पसरलेली संपूर्ण जमीन ट्रस्टच्या ताब्यात देण्यात येईल. सरकार त्या जागेवर राम मंदिर बांधणीवर नजर ठेवेल असेही सांगितले.

फेब्रुवारी २०२० मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राम मंदिराच्या निर्मितीवर देखरेखीसाठी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाच्या स्थापनेची घोषणा केली होती.

Exit mobile version