सीतेच्या हातून रावणाला गोमांस; रामायणाची खिल्ली उडवणाऱ्या नाटकावर आक्षेप

सीतेच्या हातून रावणाला गोमांस; रामायणाची खिल्ली उडवणाऱ्या नाटकावर आक्षेप

पुद्दुचेरी विद्यापीठातील एका नाटकामुळे नवा वाद उभा राहिला आहे. विद्यापीठामधील एझिनी या वार्षिक सांस्कृतिक सोहळ्यात ‘सोमानयम’ नावाचं नाटक सादर करण्यात आलं. या नाटकात काही आक्षेपार्ह दृश्ये दाखविण्यात आली असून हे नाटक वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. विद्यापीठातील हिंदू विद्यार्थी संघटनांनी या नाटकावर आक्षेप घेतला आहे. अभाविपने या प्रकरणी पोलीस कारवाईचीही मागणी केली आहे.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी ‘सोमायनम’ या नाटकातल्या प्रसंगांवर आक्षेप घेतला आहे. या नाटकांत काल्पनिक व्यक्तिरेखांच्या माध्यमांतून सीता आणि हनुमान यांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. नाटकांत रामायणाची खिल्ली उडवणारे प्रसंग आहेत असंही अभाविपने म्हटलं आहे. या नाटकात सीता रावणाला गोमांस देते आणि त्याच्यासह नाच करते असं दाखवण्यात आलं आहे. तर, दुसऱ्या एका प्रसंगात प्रभू रामाचा निरोप घेऊन हनुमान सीतेला शोधण्यासाठी जातात त्यावेळी प्रभू राम त्याला फोन करतात. हनुमान फोन उचलतात. मात्र, रेंज नसल्यामुळे आवाज ऐकू येण्यात अडथळा येतो. त्यानंतर हनुमान आपली शेपूट उंचावतात आणि रेंज येते असं दाखवण्यात आलं आहे. शिवाय प्रभू राम रावणाचा वध करतात. तेव्हा रावणाच्या मृतदेहाजवळ सीता बसून शोक करु लागते. तिला प्रभू राम ओढत नेतात, तिची येण्याची इच्छा नसते तरीही तिला ओढत नेतात, असे हे काही वादग्रस्त आणि आक्षेपार्ह प्रसंग नाटकात दाखविण्यात आले आहेत.

ही वाचा :

दिल्लीत इंडिया आघाडीसोबत आणि बंगालमध्ये ममता म्हणतात, काँग्रेसला मत म्हणजे भाजपला मत

गडचिरोली पोलिसांची कारवाई; महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेवरील माओवादी कॅम्प उद्ध्वस्त

अरविंद केजरीवालांना १४ दिवसांची न्यायालयीने कोठडी

ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींना ‘भारतरत्न’ पुरस्कार

अभाविपने या प्रसंगांवर आक्षेप घेत निषेध नोंदवला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली विद्यापीठातील काहीजणांकडून धार्मिक भावना आणि सांस्कृतिकदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या गोष्टींचे विडंबन केले जाते, असे ‘अभविप’च्या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

Exit mobile version