राम मंदिर उद्घाटनाच्या दिवशी रिलायन्स उद्योगाकडून सुट्टी जाहीर

राम मंदिर उद्घाटनाच्या दिवशी रिलायन्स उद्योगाकडून सुट्टी जाहीर

अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स उद्योगसमूहाने त्यांच्या देशभरातील सर्व कर्मचाऱ्यांना २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त सुट्टी जाहीर केली आहे.

अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाच्या ऐतिहासिक सोहळ्यात रिलायन्स उद्योगाच्या कर्मचाऱ्यांना सक्रियपणे सहभागी होता यावे, यासाठी रिलायन्स उद्योगाने हे पाऊल उचलले आहे.

केंद्र सरकारने २२ जानेवारी रोजी त्यांचे सर्व कर्मचारी, संस्था आणि औद्योगिक आस्थापनांना अर्धा दिवस सुट्टी जाहीर केली आहे. १८ जानेवारी रोजी अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका, विमा कंपन्या, अर्थविषयक संस्था आणि ग्रामीण बँका २२ जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त बंद राहतील, असे नमूद केले होते.

हे ही वाचा:

चेहऱ्यावर मनमोहक हास्य, कपाळावर टिळा अन हातात धनुष्यबाण!

देशातील सर्वात मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पाचे पंतप्रधान मोदींकडून लोकार्पण; कसा आहे प्रकल्प?

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश म्हणाला, ‘माझा रामलल्ला विराजमान झाला’!

नरेंद्र मोदींच्या रूपाने ग्लोबल, व्हिजनरी लीडर लाभला

महाराष्ट्र सरकारनेही २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमन केली जाणाऱ्या अर्थविषयक मार्केटही या दिवशी बंद राहणार आहेत. त्यामुळे गव्हर्नमेंट सिक्युरिटी, फॉरेन एक्स्चेंज, मनी मार्केट आदीमध्ये व्ववहार होणार नाहीत, असे आरबीआयने नमूद केले आहे. निफ्टी मार्केटही या दिवशी बंद राहणार आहे.

Exit mobile version