अयोध्येमधील भव्य राम मंदिर निर्माणाला सुरवात झाली असून यासाठी निधी संकलना जानेवारीपासून सुरुवात होत आहे. निधी संकलनाचा राष्ट्रव्यापी कार्यक्रम प्रारंभ करण्यासाठी मकर संक्रातीचा मुहूर्त निश्चित झाला आहे. राम जन्मभूमी तिर्थक्षेत्र न्यासाच्या ट्विटर हॅण्डलवरून या विषयीची माहिती देण्यात आली.
https://twitter.com/ShriRamTeerth/status/1338739062434357250?s=20
निधी संकलनाच्या या राष्ट्रीय कार्यक्रमात विश्व हिंदू परिषदेचा महत्वपूर्ण सहभाग असणार आहे. देशभरातील लाखो रामभक्त ५,२५,००० गावांमधून निधी संकलन करणार आहेत. भाविकांना यथाशक्ती निधी देता येईल. त्यांच्या सोयीसाठी १०,१००,१००० रुपयांची कुपन्स उपलब्ध असणार आहेत. जर देणगीची रक्कम वीस हजारपेक्षा अधिक असेल तर देणगी धनादेशाच्या माध्यमातून स्वीकारण्यात येणार आहे.
https://twitter.com/ShriRamTeerth/status/1338739067035529219?s=20
स्वयंसेवक पाच-पाचच्या गटात फिरून निधी संकलन करणार आहेत. निधी संकलन संपूर्णपणे पारदर्शक असणार आहे. स्वयंसेवकांनी जमा झालेला निधी पुढल्या ४८ तासांत अधिकृत बँक खात्यात जमा केले जाणार आहे. मकर संक्रांतीला सुरु होणारे हे अभियान माघ पौर्णिमेपर्यंत चालणार आहे म्हणजेच १५ जानेवारीला सुरु होऊन २७ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.