‘देशातील बहुतेक मुस्लिम नागरिकांना असे वाटते की, प्रभू राम सर्वांचे आहेत आणि तेही अयोध्येतील राम मंदिराच्या बाजूने आहेत,’ असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित मुस्लिम राष्ट्रीय मंचाने केला आहे. यासाठी त्यांनी गुजरातच्या एका धर्मादायी ट्रस्टने केलेल्या सर्वेक्षणाचा हवाला दिला आहे. तसेच, ‘तथाकथित उलेमा, मौलाना आणि विरोधी पक्ष जे इस्लामाच्या नावावर राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यावर पूर्ण बहिष्कार टाकला पाहिजे, असे मुस्लिम समाजातील बहुतेकजण मानतात,’ असा दावाही त्यांनी केला.
‘देशातील ७४ टक्के मुस्लिम अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणामुळे खूष आहेत, असे आरएसएसचे वरिष्ठ नेता इंद्रेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम राष्ट्रीय मंचाने (एमआरएम) सर्वेक्षण अहवालानुसार सांगितले. तसेच, या सर्वेक्षणात ७४ टक्के मुस्लिमांनी राम मंदिराच्या बाजूने आणि ७२ टक्के मुस्लिमांनी मोकळेपणाने सरकारच्या बाजूने आपले मत मांडले, असे ते म्हणाले. २६ टक्के मुस्लिमांनी मोदी सरकारवर विश्वास नसल्याचे सांगत धार्मिक कट्टरतेचा उल्लेख केला. राम हा भक्तीचा विषय आहे, हे त्यांनी मानले मात्र ते कधी राम मंदिर जातील, असे त्यांना वाटत नाही आणि त्यांचा मोदी सरकारवही विश्वास नाही.
हे ही वाचा:
मालदीवच्या अध्यक्षांनी तोडले अकलेचे तारे!
‘आरआरआर’ फेम अभिनेता रामचरण राम मंदिरासाठी सपत्निक आमंत्रित
इंडी आघाडीच्या संयोजकपदासाठी खर्गे यांच्या नावाचा प्रस्ताव
मॉडेल दिव्या पाहुजाचा मृतदेह मिळाला
आयुर्वेद फाऊंडेशन चॅरिटेबल ट्रस्टने दिल्ली एनसीआर, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरयाणा, हिमाचल, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, आसाम आणि ईशान्येकडील अन्य राज्यांमध्ये ‘राम जन सर्वेक्षण’ केले गेले आणि १० हजार लोकांची मते जाणून घेण्यात आली. ७० टक्के मुस्लिमांना वाटते की, भारत जागतिक शक्तीच्या रूपात पुढे आला आहे, असे एमआरएमने सांगितले.