25 C
Mumbai
Friday, January 10, 2025
घरदेश दुनियाथ्रेड्सने निम्म्याहून अधिक वापरकर्ते गमावले, झुकरबर्गना धक्का

थ्रेड्सने निम्म्याहून अधिक वापरकर्ते गमावले, झुकरबर्गना धक्का

Google News Follow

Related

Meta च्या नवीन मजकूर-आधारित सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, थ्रेड्सची त्यांच्या लाँचच्या वेळी जगभर खूप चर्चा झाली होती. जुलैच्या सुरुवातीला, मेटा लवकरच Twitter ला पर्यायी ऍप लॉन्च करण्याची योजना आखत असल्याचे वृत्त समोर आले आणि ५ जुलै रोजी थ्रेड्स हा नवीन सोशल मीडिया संवाद ऍप बाजारात आला.

शब्द मर्यादेमध्ये वाढ आणि इतर विविध बदल लादल्याबद्दल एलोन मस्कच्या ट्विटरवर नाराज असलेले लोक, थ्रेड्सकडे झुकले आणि ऍप लाँच झाल्याच्या ५ दिवसात तब्बल १०० दशलक्ष लोक याच्याशी जोडले गेले. थ्रेड्स ही सर्वात वेगाने वाढणाऱ्या सोशल मीडिया साइट्सपैकी एक असल्याचेही सांगितले गेले. तथापि, अलीकडील अहवालांनुसार, साइन अप केल्यापासून केवळ अर्ध्याहून कमी वापरकर्ते सक्रियपणे थ्रेड्स वापरत असल्याची बाब समोर आली आहे.

 

थ्रेड्सनी अर्ध्याहून अधिक वापरकर्ते गमावले

रॉयटर्सच्या अहवालात असे दिसून आले आहे की लॉन्च झाल्यापासून अर्ध्याहून अधिक वापरकर्त्यांनी थ्रेड्स वापरणे बंद केले आहे. एका टाऊन हॉलमध्ये बोलत असताना मेटा सीईओ मार्क झुकेरबर्गने हेच उघड केले आणि सांगितले की जरी थ्रेड्स अॅपवरील रिटेंशन मेटा अधिकाऱ्यांच्या अपेक्षेपेक्षा चांगले होते, तरी ते परिपूर्ण नव्हते’. रॉयटर्सने त्यांना मिळालेल्या अंतर्गत फोन कॉलच्या आधारे ही माहिती दिली आहे.

हे ही वाचा:

मोदींना हुकूमशाह म्हणणारे उद्धव ठाकरे सोनिया गांधींपुढे लोटांगण घालतात !

शूर सैनिकांसाठी ‘मेरी माटी मेरा देश’ मोहीम !

देशातील वाघांची झेप; संख्येत २४ टक्क्यांनी वाढ…आता ३६८२ वाघ

‘मणिपूरमधील संघर्षात परकीयांचा हात असू शकतो’

“स्पष्टपणे सांगायचे तर तुमच्याकडे जर १०० दशलक्षाहून अधिक लोक साइन अप करत असतील, तर सर्वसाधारणपणे ते सर्व किंवा त्यापैकी अर्धेही कायम राहिले तर ते आदर्श असेल. पण आम्ही अजून तिथे पोहोचू शकलेलो नाही आहोत,” झुकरबर्ग म्हणाला. तथापि, वापरकर्त्यांमधील घसरण अपवादात्मक आहे असे वाटत नाही, असेही झुकेरबर्ग म्हणाला. अहवालात ही बाब उद्धृत केली आहे की वापरकर्त्यांमधील घसरण ‘सामान्य’ होती आणि कंपनीने ऍपमध्ये अधिक वैशिष्ट्ये जोडल्यामुळे ते रिटेंशन दर सुधारण्याबद्दल आशावादी होते.

थ्रेड्सच्या भविष्यावर मार्क झुकरबर्ग

यापूर्वी, एका बिझनेस इनसाइडरच्या अहवालात असे दिसून आले होते की झुकरबर्गने विश्लेषकांसह दुसऱ्या तिमाहीच्या कमाईच्या कॉन्फरन्स कॉलमध्ये सांगितले की, टीमकडे थ्रेड्सवर बरेच ‘मूलभूत काम करायचे आहे’ ज्यात ‘वापरकर्त्यांना आवडत असलेल्या वैशिष्ट्यांसह ते तसे तयार करणे आणि प्रयोग करणे’ यांचा समावेश आहे. मेटा सीईओने असेही सांगितले की बर्‍याच लोकांना वैविध्यपूर्ण अनुभवाची आवड असू शकते, परंतु त्यांनी (मेटा टीम) अनुभव अधिक चांगला करणे आवश्यक आहे जेणेकरून वापरकर्ते प्लॅटफॉर्म वापरत राहतील आणि ‘थ्रेड्स हे वापरण्यास एक चांगले ऑनलाईन व्यासपीठ आहे, असे यूजर्सना वाटले पाहिजे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा