केवळ कमाल! झिऑन हातांनी धावत गेला २० मीटर

केवळ कमाल! झिऑन हातांनी धावत गेला २० मीटर

ओहोयोचा रहिवासी असलेल्या झिऑनला जन्मतः पाय नव्हते. रिग्रेशन सिंड्रोमने त्रस्त असलेला झिऑन हा सर्वांपेक्षा वेगळा होता. शाळेत असल्यापासूनचा त्याचा खेळामध्ये रस होता. पण आज तो जागतिक विक्रमाचा मानकरी आहे. काय झाले त्याच्या आयुष्यात…

झिऑनने १५ फेब्रुवारी २०२१ रोजी अमेरिकेच्या ओहियो, मॅसिलोन येथील त्याच्या माजी हायस्कूल जिममध्ये हातात सर्वात वेगाने २० मीटर चालण्याचा प्रयत्न केला. यामुळेच आता झिऑन क्लार्कच्या नावाची चर्चा अवघ्या जगभरात होत आहे. २३ वर्षीय व्यक्तीने एक अनोखा परंतु प्रेरणादायी विश्वविक्रम मोडला आहे. हा विक्रम पूर्ण करण्यासाठी त्याला ४.७६  सेकंद लागली. क्लार्कने आपल्या इन्स्टाग्राम पेजवर या विक्रमाचा व्हिडिओ नुकताच शेअर केला आहे. झिऑन क्लर्कच्या शिरपेचात अनेक तुरे आहेत. आता यामध्ये एक नवीन भर पडलेली आहे ती म्हणजे गिनिज बुक रेकार्डची.

फेब्रुवारी २०२१ मध्ये, त्याने हातावर धावू शकणारा सर्वात वेगवान माणूस होण्याचा विक्रम मोडण्याचा पहिला प्रयत्न केला. त्याने ओहायोच्या मॅसिलोनमधील त्याच्या हायस्कूलच्या जिममध्ये हा रेकॉर्ड नोंदवला आहे.

हे ही वाचा:

डबेवाला भवन अजूनही स्वप्नच; पदरी निराशा

जर्मन निवडणुकीनंतर चित्र अस्पष्टच?

धक्कादायक! … म्हणून तो देणार होता बायकोचा बळी!

परमबीर यांच्यासह २५ जणांना निलंबित करण्याचा प्रस्तावच फेटाळला

यासंदर्भात बोलताना झिऑन म्हणतो, “मी शेवटी जाहीर करू शकतो की, मी अधिकृतपणे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड धारक आहे! २० मीटरसाठी दोन हातांवर सर्वात वेगवान माणूस म्हणून मी ओळखला जाणार आहे. ही माझ्यासाठी एक मोठी कामगिरी आहे. मी २०२१ या वर्षातील मुख्य वैशिष्ट्यांपैकी एक आहे. तुमच्याकडे जे आहे त्यात बेस्ट द्या, असेही यावेळी झिऑन म्हणाला. तसेच मी माझा पुढचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करण्यास तयार आहे असेही त्याने यावेळी म्हटले.

Exit mobile version