रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध १९ व्या दिवशीही सुरूच आहे. रशियन लष्कराने युक्रेनची राजधानी कीवचा वेढा आणखी तीव्र केला आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी आज सकाळी नाटोच्या इतर देशांना इशारा दिला आहे.
रशियन सैन्याचा हल्ला पोलंडपासून युक्रेनच्या सीमेजवळ पोहोचला आहे. रशियाने रविवारी पश्चिम युक्रेनमधील लष्करी प्रशिक्षण तळावर आठ रॉकेट डागले. तर रशियनसैन्याने कीवच्या बाहेरील भागात गोळीबार तीव्र केला आहे. दरम्यान झेलेन्स्की यांनी नाटो देशांना इशारा देत योग्य पावले उचलण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर नाटोने वेळीच योग्य पावले उचलली नाहीत, तर रशिया आपल्या सदस्य देशांना लक्ष्य करण्यास सुरुवात करेल, असेही झेलेन्स्की म्हणाले.
झेलेन्स्की यांनी एका व्हिडिओ संदेशात या गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांनी नाटोला युक्रेनच्या आकाशात नो-फ्लाय झोन घोषित करण्याची विनंती केली आहे. रशियन सैन्याने पोलंड सीमेजवळील युक्रेनच्या लष्करी तळाला लक्ष्य केल्यानंतर एका दिवसानंतर झेलेन्स्की यांनी हे वक्तव्य केले आहे. झेलेन्स्की म्हणाले की, ” जर नाटोने युक्रेनसाठी नो फ्लाय झोन केले नाही तर रशियाने टाकलेली क्षेपणास्त्रे नाटोच्या भूभागावर पडण्यास फार वेळ लागणार नाही.”
झेलेन्स्की यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये असेही म्हटले आहे की, त्यांनी गेल्या वर्षीही नाटोला इशारा दिला होता. रशिया निर्बंधांशिवाय युद्ध करू शकतो आणि नॉर्ड स्ट्रीम २ पाइपलाइनचा वापर शस्त्र म्हणून करू शकतो. प्रादेशिक गव्हर्नर मॅक्सिम कोझित्स्की यांनी सांगितले की, रशियन विमानांनी येथे सुमारे तीस रॉकेट डागले आहेत.
हे ही वाचा:
फडणवीस यांना पाठवण्यात आलेली नोटीस ही आरोपी म्हणून नाही
जागतिक बाजारात भारतातल्या स्टीलला मोठी मागणी
१७ मार्चला होणार नासाचे मेगा मून रॉकेट लॉन्च
तर युक्रेनच्या संरक्षणमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, रशियन सैन्याने लिव्हजवळ हल्ला केला आहे. जे शांतता आणि सुरक्षिततेसाठी काम करण्यासाठी आंतरराष्ट्रीय ठिकाण आहे. अनेक परदेशी संस्था येथे काम करतात. जखमींची माहिती अद्याप गोळा करण्याचे काम सुरू आहे.