अनाथ मुलींना पुरस्कार न देताच झाकीर नाईक निघून गेला!

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

अनाथ मुलींना पुरस्कार न देताच झाकीर नाईक निघून गेला!

वादग्रस्त इस्लामिक धर्मोपदेशक झाकीर नाईक हा सध्या पाकिस्तानमध्ये असून त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये असे दिन येत आहे की, पाकिस्तानातील तरुण अनाथ मुलींना झाकीर नाईक पुरस्कार देण्यास नकार देत मंचावरून निघून जात आहे. नाईक म्हणाला की, या मुलींना ‘स्वतःच्या मुली’ म्हणून संबोधणे अयोग्य आहे. मुलीना ‘नॉन-महरम’ म्हणजेच अशा व्यक्ती ज्यांचा जवळचा संबंध नाही आणि त्यामुळे विवाहासाठी त्या पात्र आहेत, असे मानले जाते.

कथित मनी लाँड्रिंगच्या आरोपांसाठी वॉन्टेड असलेला झाकीर नाईक हा कडेकोट बंदोबस्तात पाकिस्तान सरकारच्या निमंत्रणावरून सोमवारी पाकिस्तानात दाखल आला. बुधवारी, झाकीर नाईक याने पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांची भेट घेतली. यानंतर पाकिस्तान स्वीट होम फाउंडेशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात झाकीर नाईक उपस्थित होता. झाकीर नाईक याला तरुण अनाथ मुलींना पुरस्कार देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. परंतु, सूत्रसंचालकाने पुरस्कार घेण्यासाठी मुलींना बोलावताच झाकीर निघून गेला.

कार्यक्रमातून निघून जाण्यावर नाईक म्हणाला की, त्यांना ‘मुली’ म्हणून संबोधणे योग्य नाही. तुम्ही त्यांना हात लावू शकत नाही किंवा त्यांना तुमच्या मुली म्हणू शकत नाही. मुलींना ‘नॉन-महरम’ मानले जाते. इस्लाममध्ये, याचा अर्थ होतो विवाहासाठी पात्र असलेल्या. त्यामुळे तो पुरस्कार देणार नसल्याचे झाकीरने सांगितले.

हे ही वाचा : 

मनी लाँड्रिंग प्रकरणी माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनला ईडीचे समन्स!

आसाम पोलिसांनी १४ बांगलादेशी पकडले, ९ जणांकडे मिळाले आधारकार्ड!

केकमधून कॅन्सर?? बेंगळुरुत केकच्या १२ नमुन्यात सापडले घटक!

सावरकरांबाबत काँग्रेसची वाह्यात बडबड सुरूच!

मनी लाँड्रिंग आणि द्वेषपूर्ण भाषणांद्वारे धर्मांधता भडकावल्याच्या आरोपाखाली भारतात हवा असलेला नाईक २०१६ मध्येच भारतातून पळून गेला होता. सध्या तो मलेशियामध्ये आहे. महाथिर मोहम्मद यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन सरकारने त्यांना मलेशियामध्ये राहण्याची परवानगी दिली होती.

Exit mobile version