22 C
Mumbai
Friday, January 10, 2025
घरदेश दुनियापंतप्रधानांच्या ‘युवा’ योजनेतून तरुण लेखकांना प्रोत्साहन

पंतप्रधानांच्या ‘युवा’ योजनेतून तरुण लेखकांना प्रोत्साहन

Google News Follow

Related

इंडिया @75 साठी स्वातंत्र्यचळवळीतील नायकांना युवा लेखक करणार अभिवादन

देशात वाचन, लेखन आणि पुस्तक संस्कृती रुजवण्याच्या आणि जागतिक पातळीवर भारताचा आणि भारतीय लिखाणाचा ठसा उमटवण्याच्या उद्देशाने शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाने आज तरुण आणि उदयोन्मुख लेखकांना (३० वर्षांपेक्षा कमी वयाच्या) प्रशिक्षण देणाऱ्या युवा या पंतप्रधानांच्या मार्गदर्शन योजनेचा प्रारंभ केला.

युवा अर्थात (यंग, अपकमिंग आणि व्हर्सेटाईल) तरुण, उदयोन्मुख आणि अष्टपैलू लेखकांना मार्गदर्शन करणारी ही योजना भारताच्या स्वातंत्र्य चळवळीविषयी लिखाण करण्यासाठी तरुण लेखकांना प्रोत्साहन देण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाला अनुसरून आहे.

हे ही वाचा:

आता बस झालं…किमान वेतन द्या, दुकाने उघडा

अनिल देशमुख नंतर अनिल परब, फक्त दोन महिन्यांचे पाहुणे

कोविडमुळे कर्ता सदस्य गमावलेल्या कुटुंबांना निवृत्ती वेतन, विमाभरपाई

ऑक्सिजन एक्सप्रेसने पोहोचवला २०,००० मॅट्रिक टनपेक्षा अधिक ऑक्सिजन

३१ जानेवारी २०२१ रोजी मन की बात या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी, तरुण पिढीला स्वातंत्र्य संग्रामातील वीरांविषयी, या लढ्याशी संबंधित घटनांविषयी आणि स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात त्यांच्या भागांमध्ये घडलेल्या शौर्याच्या कथांविषयी लिहिण्याचे आणि त्या माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात योगदान देणाऱ्या सुपुत्रांना सर्वोत्तम पद्धतीने अभिवादन करण्याचे आवाहन केले होते.

युवा ही योजना इंडिया @75 (स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव) या प्रकल्पाचा एक भाग आहे. स्वातंत्र्य संग्रामातील अनाम वीर, स्वातंत्र्य सेनानी, राष्ट्रीय चळवळीत योगदान देणारी आणि काळाच्या ओघात विस्मृतीत गेलेली ठिकाणे आणि इतर संबंधित विषय याविषयीचा लेखकांच्या तरुण पिढीचा दृष्टीकोन, नावीन्यपूर्ण आणि सृजनशील पद्धतीने मांडण्यासाठी एक दालन उपलब्ध करून देण्याचा या योजनेचा उद्देश आहे.

भारतीय वारसा, संस्कृती आणि ज्ञान प्रणाली यांना चालना देणाऱ्या विविध विषयांवर लिखाण करण्याची क्षमता असलेली लेखकांची एक फळी या योजनेमुळे तयार होऊ शकेल.

या योजनेंतर्गत तयार झालेल्या पुस्तकांचे नॅशनल बुक ट्रस्टकडून प्रकाशन होईल आणि त्यांचे इतर भारतीय भाषांमध्येही भाषांतर करण्यात येईल. जेणेकरून साहित्य आणि संस्कृती यांची देवाणघेवाण होऊन ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेला चालना मिळेल. निवड झालेल्या तरुण लेखकांना जगातील सर्वोत्तम लेखकांशी संवाद साधण्याची, साहित्य संमेलनांमध्ये सहभागी होण्याची संधी दिली जाईल.

युवा योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये (तरुण, उदयोन्मुख आणि अष्टपैलू लेखक) :

  • या योजनेअंतर्गत १ जून ते ३१ जुलै २०२१ दरम्यानhttps://www.mygov.in/ च्या माध्यमातून एक अखिल भारतयी स्पर्धा आयोजित करून त्यातून 75 लेखकांची निवड करण्यात येईल.
  • विजेत्यांची घोषणा १५ ऑगस्ट २०२१ रोजी होईल. तरुण लेखकांना नामवंत लेखक/मार्गदर्शक यांच्याकडून प्रशिक्षण देण्यात येईल.
  • त्यांच्या मार्गदर्शनाखाली १५ डिसेंबर २०२१ पर्यंत प्रकाशनासाठी हस्तलिखिते तयार केली जातील. प्रकाशित पुस्तकांचे उद्घाटन १२ जानेवारी २०२२ रोजी राष्ट्रीय युवा दिनाच्या (युवा दिवस) निमित्ताने करण्यात येईल.
  • या मार्गदर्शन योजनेअंतर्गत प्रत्येक लेखकाला मासिक ५०,००० रुपये या प्रमाणे सहा महिन्यांसाठी एकत्रित शिष्यवृत्ती देण्यात येईल.

 

.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा