कमी उंचीमुळे मुलींचा नकार येत होता म्हणून त्याने खर्च केले ६६ लाख

कमी उंची असल्यामुळे संपूर्ण आयुष्यभर त्रास झाल्याची युवकाची होती तक्रार

कमी उंचीमुळे मुलींचा नकार येत होता म्हणून त्याने खर्च केले ६६ लाख

कमी उंचीमुळे मुली नकार देत असल्याने त्रासलेल्या अमेरिकेतील जॉर्जिया येथे राहणाऱ्या २७ वर्षीय डिनजेल सिगनर्स याने ८१ हजार अमेरिकी डॉलर (तब्बल ६६ लाख रुपये ) खर्च करून ‘लेग लेंदनिंग’ शस्त्रक्रिया केली आहे. त्यामुळे त्याची उंची पाच फूट पाच इंचावरून सहा फूट झाली आहे.

नौदलात काम केलेल्या सिगनर्स याने सांगितले की, कमी उंची असल्यामुळे मला संपूर्ण आयुष्यभर त्रास झाला आहे. त्यामुळे हा बदल करण्यासाठी मी काय केले, यामुळे काहीच फरक पडत नाही. मला नेहमी हेच हवेसे वाटत होते. ‘लिंब लेंदनिंग’ शस्त्रक्रियेमुळे मला माझे आयुष्य बदलण्याचे आणि जीवनाला समग्र रूपात पाहण्याची संधी मिळाली आहे.  

त्याला आवडणाऱ्या एका व्यक्तीने त्याचे वय आणि उंची खूप कमी असल्याचे सांगून त्याला नकार दिला होता. तो त्याला मिळालेला पहिला नकार होता. ‘ मी तिथेच थांबलो आणि महिलांसमोर जाण्याआधी माझ्या उंचीबाबत विचार करू लागलो. कारण त्यामुळे मी अनेक संधी गमावल्या होत्या,’ असे सिगनर्स सांगतो. यासाठी सिगनर्सने अनेक संशोधन केले. त्यानंतर त्यांना हवा असलेला उपाय मिळाला.

हे ही वाचा:

उघड्या खिडकीजवळ जाऊ नका! रशियन बंडखोर प्रिगोझिन यांना दिला इशारा

शॅम्पेन उडाल्याने पबमध्ये राडा, बाऊन्सरसह सहा जणांना अटक

नियंत्रण रेषेजवळ पायाभूत सुविधा उभारायला चीनची पाकिस्तानला मदत

दापोली हर्णे मार्गावरील अपघातात ८ ठार, नातेवाईकांना ५ लाख

त्याने या संदर्भात इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओही शेअर केला आहे. ज्यात त्यांनी स्वत:चे पाय दाखवले आहेत आणि स्वत:चे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. या पोस्टवर अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. असे करून त्याने जगासमोर चांगले उदाहरण ठेवले आहे, अशीही प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. तर, काहीजण त्याला या उपचाराबद्दल विचारत आहेत. एकाने तर ‘तुला चांगली पत्नी मिळेल,’ असे म्हटले आहे. तर, दुसऱ्याने शस्त्रक्रियेनंतर बरे होण्यास किती कालावधी लागतो,’ अशी विचारणा केली आहे.

Exit mobile version