शिकागोमध्ये हल्ला झालेल्या भारतातील विद्यार्थ्याकडून मदतीची हाक

कुटुंबीयांचे मदतीसाठी भारत सरकारला साकडे

शिकागोमध्ये हल्ला झालेल्या भारतातील विद्यार्थ्याकडून मदतीची हाक

भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यावर त्याच्या घराजवळच काही सशस्त्र व्यक्तींनी हल्ला करून त्याला लुटल्याची घटना शिकागोमध्ये घडली आहे. सईद मझहिर अली असे त्याचे नाव असून तो हैदराबादचा आहे. या हल्ल्यात तो जखमी झाला आहे. भारतीय सरकारने याबाबत मध्यस्थी करावी आणि त्याच्यावर योग्य ते वैद्यकीय उपचार व्हावेत, याची काळजी घ्यावी, अशी विनंती त्याच्या कुटुंबीयांनी केली आहे.

सईद हा शिकागोतील इंडियाना वेस्लियन विद्यापीठात मास्टर्स डिग्री करत आहे. ४ फेब्रुवारी रोजी त्याच्या वेस्ट रिज येथील अपार्टमेंटजवळ काही सशस्त्र व्यक्तींनी त्याच्यावर हल्ला केला. तो घरी जात असताना त्याच्यावर चार जणांनी हल्ला केल्याचे तो सांगत असल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडीओत ऐकू येत आहे. ‘मी खाद्यपदार्थ घेऊन घरी परतत असताना चौघांनी माझी वाट अडवली, मला लात मारली आणि माझ्या चेहऱ्यावर ठोसे मारले. त्यानंतर ते माझा फोन घेऊन पळून गेले. मला मदत करा,’ असे या व्हिडीओत दिसत आहे. या हल्ल्यामुळे अलीला अनेक ठिकाणी जखमा झाल्या आहेत.

दुसऱ्या एका हल्ल्यात अली हा स्वतःच्या संरक्षणासाठी पळताना दिसत असून हल्लेखोर त्याचा पाठलाग करताना दिसत आहेत. ‘त्यांनी माझ्या डोळ्याला ठोसे लगावले, माझा चेहरा आणि पाठीवर लाथा मारल्या,’ असेही अली याने सांगितल्याचे वृत्त आहे. चोरांनी त्याचा सेलफोन आणि पाकीट घेऊन पोबारा केला.

हे ही वाचा:

नांदेड: धार्मिक कार्यक्रमात जेवणानंतर तब्बल २००० लोकांना अन्नातून विषबाधा!

पाकिस्तान: बलुचिस्तानमध्ये दोन ठिकाणी स्फोट, २२ ठार!

‘काँग्रेसने नेतृत्वासाठी नेहरू-गांधी यांच्याशिवाय विचार करावा’

इंग्रजांचा प्रभाव असलेली काँग्रेस आऊटडेटेड

अली याचे कुटुंब हैदराबादमध्ये राहते. त्याची पत्नी आणि तीन अल्पवयीन मुलांना त्याच्या चिंतेने ग्रासले आहे. त्याच्या पत्नीने परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याकडे अमेरिकेला जाण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे. तर, शिकागोमधील भारतीय दूतावासाने ते अली आणि त्याच्या पत्नीच्या सातत्याने संपर्कात असून या प्रकरणी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. ‘अमेरिका ही माझी स्वप्ननगरी आहे. मी येथे माझी स्वप्नपूर्ती करण्यासाठी, माझी मास्टर्स डिग्री पूर्ण करण्यासाठी आलो आहे. परंतु कालच्या घटनेमुळे मला धक्का बसला आहे,’ अशी प्रतिक्रिया अली याने दिली.

Exit mobile version