योग ही भारताने जगाला दिलेली सांस्कृतिक देणगी!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सांगितले योगाभ्यासाचे महत्त्व

योग ही भारताने जगाला दिलेली सांस्कृतिक देणगी!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) बुधवारी सांगितले की योग ही भारताची जगाला सांस्कृतिक भेट” आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हे ट्विट केले आहे. त्यात म्हटले आहे की, योग हा केवळ शारीरिक व्यायामापुरता मर्यादित नाही, तर ती मूलत: एक समग्र जीवनशैली आहे. योगाचा संदेश जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे हे सर्व योगप्रेमींचे कर्तव्य असल्याचे संघाने म्हटले आहे.

 

संघाने ट्विट केले आहे की, “योग ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली बहुमोल देणगी आहे. ‘युज’ या मुळापासून आलेला योग या शब्दाचा अर्थ आहे एकत्र येणे. योग हा केवळ शारीरिक व्यायामापुरता मर्यादित नाही, महर्षी पतंजलींसारख्या ऋषींच्या मते ते शरीर, मन, बुद्धी आणि आत्म्याला जोडण्याचा हा एक समग्र जीवन मार्ग आहे.”

 

संघाने म्हटले आहे की, “योगाची व्याख्या ‘योगचित्तवृत्तिनिरोध’, ‘मन: प्रशमनोपया: योग’ आणि ‘समत्वम योग उच्यते’ यांसारख्या धर्मग्रंथांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे करण्यात आली आहे, ज्याचा अवलंब केल्याने मनुष्य शांत आणि निरोगी जीवनाचा अनुभव घेतो.”

हे ही वाचा:

कोविड घोटाळा प्रकरणी संजय राऊत, आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयांवर ईडीच्या धाडी

लष्कर ए तोयबाच्या साजीद मीरला काळ्या यादीत टाकण्यासाठी कुरापती चीनचा नकार

इलॉन मस्क म्हणतात, ‘मी मोदींचा चाहता’

मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचारावरून ‘बोंबाबोंब’

संघाने म्हटले आहे की योगाचे अनुसरण करून संतुलित आणि सुसंवादी जीवन जगण्याचा प्रयत्न करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, ज्यात सामान्य लोकांपासून ते जगातील विविध संस्कृतीतील प्रसिद्ध व्यक्तींपर्यंत आहेत. जगभरात योगाचा प्रसार करण्यासाठी अनेक संत, योग शिक्षक आणि योग प्रशिक्षकांनी योगदान दिल्याचे संघाने सांगितले.

Exit mobile version