आता पुढच्या वेळी जर तुम्ही एखाद्या सरकारी कार्यालयात गेलात, तर तुम्हाला योगा करताना अधिकारी दिसू शकतील.
केंद्रसरकारने खास सरकारी कार्यालयांमध्ये आता ५ मिनिटांसाठी ‘योग ब्रेक’ जाहीर केलेला आहे. कर्मचारी कामादरम्यान ताजेतवाने राहावेत, याकरता आता सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना Y- ब्रेक ऍप (Y-Break App) डाउनलोड करण्यास सांगण्यात आलंय. योगाच्या पद्धती आणि फायदे या ऍपमध्ये सांगितले गेले आहेत. तसेच हे ऍप आयुष मंत्रालयानं विकसित केलेले आहे. हा आदेश सरकारनं २ सप्टेंबर रोजी काढलाय. त्यामुळं आता सरकारी अधिकाऱ्यांना दररोज कामादरम्यान ५ मिनिटांचा योगा ब्रेक मिळणार आहे.
कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानं (डीओपीटी) दोन दिवसांपूर्वी काढलेल्या आदेशात सर्व मंत्रालयांना या ऍपचा वापर करण्यास आणि तो इतरांनी करण्यासाठी प्रोत्साहन देण्यास सांगितलं आहे. आदेशात लिहिलंय की, ‘भारत सरकारच्या सर्व मंत्रालये आणि विभागांना विनंती आहे की, Y- ब्रेक ऍपच्या वापराला प्रोत्साहन द्या.’ डीओपीटीनं २ सप्टेंबरला जारी केलेल्या आदेशात म्हटलंय की, अँड्रॉईड-आधारित वाय-ब्रेक ऍप्लिकेशन डाउनलोड करणं बंधनकारक आहे.
आयुष मंत्रालयानं हे मोबाईल ऍप्लिकेशन एका मोठ्या कार्यक्रमात लाँच केलं. यात सहा मंत्र्यांनी भाग घेतला होता. डीओपीटी मंत्री जितेंद्र सिंहदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी कायदा मंत्री किरेन रिजिजू यांना ‘कामाच्या ठिकाणी पाच मिनिटे योग-ब्रेक लागू करण्याची विनंती केली, जेणेकरून लोक त्याचा लाभ घेऊ शकतील. यावेळी उपस्थित मंत्र्यांनी संपूर्ण विधानसभेत ऍपवर दाखवल्याप्रमाणे योगासनं केली.
हे ही वाचा:
केरळमध्ये अशी झाली ‘दृश्यम’ स्टाईल हत्या
अनिल देशमुख फरार; ईडीने बजावली लूकआऊट नोटीस
कृष्णा नागरची ‘शटल’ एक्स्प्रेस; जिंकले सुवर्ण
कायदे मंत्री किरेन रिजिजू यांनी या ऍपचा वेगानं प्रसार होईल, असा विश्वास व्यक्त केला. आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी पाच मिनिटांचा योग प्रोटोकॉल विशेषतः कार्यरत व्यावसायिकांसाठी त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी असल्याचं म्हटलं. कामाच्या ठिकाणी असलेला तणाव कमी करण्यासाठी, लोकांना ताजेतवाने करण्यासाठी आणि पुन्हा कामावर लक्ष केंद्रित करणं सोपं जावं यासाठी हे ऍप निर्मित केल्याचं ते म्हणाले. यात आसनं, प्राणायाम आणि ध्यान यांचा समावेश आहे.