शी जिनपिंगची तिबेट भेट हा भारताला इशारा?

शी जिनपिंगची तिबेट भेट हा भारताला इशारा?

शी जिनपिंग यांनी तिबेटला दिलेली भेट ही भारतासाठी एक धमकी आहे, असं मत अमेरिकेच्या एका महत्वाच्या खासदाराने व्यक्त केलं आहे. डेवीन नुनेस हे रिपब्लिकन पक्षाचे कॅलिफोर्निया राज्यातून निवडून येणारे खासदार आहेत. त्यांनी असं मत व्यक्त केलं आहे की, शी जिनपिंग यांनी न्यांगचीला दिलेली भेट ही भारताचा पाणीपुरवठा तोडण्याची धमकी आहे.

डेवीन नुनेस हे अमेरिकेतील हाऊस इंटेलिजन्स कमिटी म्हणजेच गुप्तहेर समितीचे माजी अध्यक्ष होते. तर आजही ते या समितीचे सदस्य आहेत. त्यांनी यावेळी बायडन प्रशासनावरही हल्लाबोल केला. बायडन प्रशासन हे चीनला रोखण्यासाठी आवश्यक पावला उचलत नाहीये, अशी टीका नुनेस यांनी केली आहे.

हे ही वाचा:

देशासाठी मेडल जिंकलं तरच आम्ही भारतीय ठरतो

मोदी सरकार कर्जबुडव्यांविरोधात उचलणार ‘हे’ कठोर पाऊल

अर्जुन पुरस्कार विजेते माजी बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर कालवश

काय आहे भारत-रशिया दरम्यानचा इंद्र-२१ युद्ध सराव?

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी २१ जुलै रोजी भारतीय सीमेपासून १६ किलोमीटर अंतरावर न्यांगची या भागात भेट दिली होती. हे भेट पूर्णपणे गुप्त ठेवण्यात आली होती. या भेटीची माहिती चीनच्या सरकारी मीडियाने शुक्रवारी प्रसिद्ध केली होती. चीनच्या कम्युनिस्ट सरकारने १९५० च्या दशकात तिबेटचा घास घेतला. तेंव्हापासून चीनने तिबेटी जनतेवर मोठ्या प्रमाणात अन्याय आणि अत्याचारांना सुरवात केली आहे. त्यामुळेच दलाई लामा यांना तिबेट सोडून भारतात यावे लागले होते. तेंव्हापासून आजही भारतात दलाई लामा आणि तिबेटी जनता आश्रय घेऊन राहत आहेत.

चीनचे क्रौर्य, कमकुवतपणाचे लक्षण?

या दौऱ्याबरोबरच तिबेटमध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर चीनने एक मोठं धरण बांधण्याचीही योजना आणली आहे. यामुळे ब्रह्मपुत्रेच्या पाण्यावर अवलंबून असलेला पूर्वोत्तर भारताचा एक मोठा संकटात येऊ शकतो. शी जिनपिंग यांच्या या भेटीसंदर्भात काल न्यूज डंकाने एक सविस्तर व्हिडिओ देखील केला आहे, तो नक्की पहा…

Exit mobile version