चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग नवी दिल्लीत होणाऱ्या जी २० परिषदेला अनुपस्थित राहणार आहेत. तसे चीन सरकारतर्फे भारताला अधिकृतरीत्या कळवण्यात आले आहे. त्याऐवजी ली क्विआंग यांच्या नेतृत्वाखालील चीनचे शिष्टमंडळ जी २० परिषदेत सहभागी होणार आहे. शुक्रवारपर्यंत भारताला चीनकडून शी जिनपिंग हे जी २० परिषदेला उपस्थित राहतील की नाही, याबाबत अधिकृतरीत्या कळवण्यात आले नव्हते. अखेर शनिवारी त्यांच्या अनुपस्थितीबाबत भारताला अधिकृतरीत्या कळवण्यात आले आहे.
जी२० परिषदेला गैरहजर राहण्याची ही शी जिनपिंग यांची पहिलीच वेळ असेल. जी२० परिषदेला गैरहजर राहणारे शी जिनपिंग हे दुसरे राष्ट्राध्यक्ष आहेत. याआधी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांनी पंतप्रधान मोदी यांना व्यक्तिश: दूरध्वनीवरून संपर्क साधून परिषदेला हजर राहण्याबाबत असमर्थता दर्शवली होती. त्याऐवजी परिषदेला रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जी लॅवरॉव्ह उपस्थित राहणार आहेत.
हे ही वाचा:
अंधेरी पूर्व ते विमानतळ भूमिगत मेट्रोच्या भुयारीकरणाला प्रारंभ
झिम्बाब्वेचा स्टार खेळाडू हिथ स्ट्रीकचे निधन
महाविकास आघाडी नेत्यांची मराठा आरक्षण आंदोलकांना भेटण्यासाठी चढाओढ
क्रिकेटचाहत्यांच्या इच्छांवर फेरले गेले पावसाचे पाणी, भारत-पाक सामना रद्द
शी जिनपिंग आणि पंतप्रधान मोदी यांची अखेरची भेट दक्षिण आफ्रिकेतील ब्रिक्स परिषदेत झाली होती. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी भारत-चीन सीमेलगत पश्चिम क्षेत्रातील वास्तविक नियंत्रण रेषेसंदर्भातील वादग्रस्त मुद्द्यांबाबत चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याकडे चिंता व्यक्त केली होती, असे परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी सांगितले होते. सन २०२०मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतरची ही दुसरीच भेट होती. शी जिनपिंग यांनी जी २० शिखर परिषदेला अनुपस्थित राहण्यामागे वेगळे संकेत असल्याचे मानले जात आहेत. भारताबरोबरचा सीमावाद सोडवण्यात चीन उत्सुक नसल्यानेच चीनचे अध्यक्ष जिनपिंग या शिखर परिषदेला टाळत आहेत, असे काही तज्ज्ञांचे मत आहे.